Share

पंतप्रधान म्हणून कोण चांगलं असेल? शरद पवार की उद्धव ठाकरे? श्रीकांत शिंदेंनी दिले ‘हे’ उत्तर

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामा ओपन माइक कार्यक्रमात पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे चांगले की शरद पवार असा प्रश्न केला यावर श्रीकांत शिंदे यांनी जबरदस्त असे उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

महाराष्ट्र राजकारणात पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार कोण याची नेहमी चर्चा असते. एकीकडे पंतप्रधान म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चर्चा होत असते. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना पक्ष केंद्रात जाईल, असा दावा करत असतात.

याच पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रात तुमचं सरकार आलं तर पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे की शरद पवार चांगले असतील? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदें यांना विचारला. यावर आमचं सरकार येईल तेव्हा श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे चांगले पंतप्रधान असतील, असं उत्तर दिलं.

या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यासोबतच इतर नेत्यांच्या प्रश्नांना देखील उत्तरं दिली. आदिती तटकरे यांनी त्यांना प्रश्न केला की, संसदेत ही तुमची दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला संसदेत काय फरक जाणवला? असा प्रश्न केला. यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले.

म्हणाले, 2014 मध्ये सर्वच नवीन होतं. सुरुवातीचा काळ सर्व गोष्टी समजण्यात गेला. संसदेत खूप काही शिकण्यासारखं होतं. मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणांमधून शिकता आलं असे ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत कोणाच्या कामावर समाधानी आहेत? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? असाही प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला.

यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा गाडा हाकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काम करतात. एकनाथ शिंदेंना मंत्रीपदाची संधी उद्धव ठाकरेंमुळेच मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत.

श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत, त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान, धीर देशमुख यांनी एक खासगी प्रश्न विचारला तेव्हा सभागृहात हशा पिकला. तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न धीरज देशमुखांनी विचारला तेव्हा शिंदे यांनी मजेशीर उत्तर दिलं. यामध्ये अनेक नावे घेता येतील, असं ते म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now