Share

‘आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं..’; प्रसाद ओकसाठी ‘या’ अभिनेत्याची खास पोस्ट

सध्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘ या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात शिवसैनिक आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याचा अभिनय पाहून लोक थक्क झाले आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्धने देखील प्रसाद याचं कौतूक केलं आहे.

चित्रपटात प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका हुबेहूब साकारली आहे.  चित्रपटाची आणि प्रसादच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र होत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी याने देखील प्रसाद ओकचा अभिनय पाहून एक खास पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रसाद ओक तुझं खूप खूप कौतुक, तुझं खूप खूप अभिनंदन. वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण दोघांनी केलेल्या ‘अथांग’ नावाच्या सिरीयलपासून ते आता धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या भूमिकेपर्यंतचा तुझा प्रवास मी पाहिला आहे.

खूपच कौतुकास्पद, यशस्वी आहे तो, प्रेरणादायीसुद्धा. आपला मित्र इतकं कसं छान काम करतो, याचा अभिमान वाटतो. दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो तू अप्रतिमच काम करतोस. आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं, आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत.

तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस. तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे, त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा. माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात. धर्मवीरच्या संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा.

मिलिंद गवळीच्या या पोस्टवर प्रसाद ओक याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं मिलिंद गवळीचे आभार मानले आहेत. चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास, चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका क्षितिज दाते यांनी साकारली आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now