Share

१७८८ खोल्यांच्या महालात राहणाऱ्या सुलतानच्या लेकीचा भव्यदिव्य विवाहसोहळा, फोटो पाहून अवाक व्हाल

sultan

तुम्हाला माहिती आहे का की, आपण ज्यांना जगातील सर्वात श्रीमंत लोक समजतो ते लोक मुळात जगातील सर्वात श्रीमंत लोक नाहीत. जर आपल्याला जगातील सर्वात श्रीमंत लोक कोण आहेत, असे विचारले तर आपल्याकडून बिल गेट्स, जेफ बेझोस यांची नावे उत्तर म्हणून दिली जातील.( who lived in a 1788-room palace, you will be amazed to see the photos)

मात्र वास्तवात हे लोक सर्वात श्रीमंत नाहीत, तर सर्वात श्रीमंत लोक हे दुबईमधील आहेत. या लोकांपेक्षा दुबईतील कित्येक अरबांकडे बक्कळ संपत्ती आहे. पण ते लोक स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत लोक म्हणू शकत नाहीत कारण त्यांची संपत्ती जगजाहीर नाही.

Brunei Princess Wedding 7 दिन चले शाही फंक्शन, तस्वीरें देख खुली रह जाएंगी  आंखें | DNA HINDIआपण ज्यांना आज श्रीमंत समजतो त्यांनी स्वतःच्या कष्टाने संपत्ती कमवली आहे आणि सरकारकडे कर भरलेला आहे. पण काही जनांकडे पूर्वजांची संपत्ती आहे आणि ती संपत्ती ते लोक उघड करू शकत नाहीत. असाच एक व्यक्ती ब्रुनेई देशाचा सम्राट सुलतान हसनल बोल्किया, नुकतेच त्याच्या मुलीचा शाही भव्यदिव्य विवाहसोहळा पार पाडला आहे.

त्याने या लग्नसोहळ्यावर अक्षरश: समुद्रासारखा पैसा खर्च केला. अगदी आपण पऱ्यांच्या दुनियेतील शाही विवाहसोहळे पाहतो तसाच हा विवाह सोहळा होता. सुलतान हसनल बोल्किया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या मुलीसाठी जो खर्च केला आहे, त्याची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.

Sultan Of Brunei Hassanal Bolkiah Daughter Gets Married See Photos: ब्रुनेई  के सुल्तान हसनल बोल्किया की बेटी की भव्य शाही शादी, देखें तस्वीरें -  Navbharat Times

१७८८ खोल्यांचा त्याचा महाल असून या महालातच तब्बल सात दिवस हा शाही विवाहसोहळा पार पडला. त्याची मुलगी प्रिन्सेस फादजीला लुबाबुल बोल्कियाने हिने यावेळी जे कपडे परिधान केले होते, ते अत्यंत आकर्षक आणि भन्नाट होते. आजवर कोणत्या अभिनेत्रींनीसुद्धा, असे आऊटफिट परिधान केले नसतील. तिचे दागिनेसुद्धा एकदम स्टनिंग होते.

या लग्नाची खास गोष्ट म्हणजे नवरा नवरी या दोघांनीही सेम रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यांच्या कपड्यांच्या रंगापासून ते अगदी प्रिंटपर्यंत सर्वकाही सारखेच होते. प्रिन्सेसने लग्नासाठी वेगळ्याप्रकारचा गाऊन परिधान केला होता. ज्याला बोटकट नेकलाईन आणि फुल स्लीवज होती. या गाऊनला क्रिस्टल वर्कने सजवले होते.

आपल्या सुंदर वेंडिंग ड्रेसला तिने साजेशे दागिने घातले होते. ते दागिने तिच्यावर अगदी खुलून दिसत होते. प्रिन्सेसने हातामध्ये एकदम सुंदर हिऱ्यांची अंगठी घातली होती. तिच्या हाताच्या मनगटावर हिरेजडीत ब्रेसलेट होते. तिच्या कानात स्टडीड इअररिंग्स आणि गळ्यात हेवी डायमंड नेकपीस होता.

तिचा लूक टील ब्लू गाऊनमध्येही बघायला मिळाला. त्यामध्येही ती अगदी सुंदर दिसत होती. त्यांनी मलेशियाचे प्रसिद्ध डिझायनर बर्नाड चंद्रन यांची निवड केली होती. डिझायनरने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर प्रिन्सेसने लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.

महत्वाच्या बातम्या
अल्ला हु अकबर’च्या घोषणा का दिल्या? मुस्कानने सांगितला ‘त्या’ दिवशीचा पुर्ण घटनाक्रम
कल्पना दत्त: अशी महिला स्वातंत्र्यसैनिक जी पुरुषांच्या वेशात क्रांतिकारकांना पोहोचवायची शस्त्रे, वाचा तिच्याबद्दल..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now