Share

‘भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण?’

Vikram Gokhale Says Stop Watching Nonsense TV Serials

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी नुकतीच एका व्याख्यानमालेदरम्यान प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोरंजन सृष्टीचा दर्जा या विषयावर बोलताना आपले रोखठोक मत मांडले आहे. प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नये, असे त्यांनी व्याख्यानमालेत बोलताना म्हटले.

या विधानावरुन आता गोखले यांच्यावर टीका होतं आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक विजू माने म्हणाले, गोखले यांना जर कोणत्या मालिका भिकार वाटत असतील तर त्यांनी त्या पाहू नयेत. त्यांच्यावर न आवडणाऱ्या मालिका पाहण्याची सक्ती कुणीच करणार नाही.’

तसेच कोणत्या मालिका पाहाव्यात, त्या निवडण्याइतके प्रेक्षक सूज्ञ आहेत. खुद्द गोखले यांनीही दीर्घ कारकीर्द केली आहे. मालिकात काम केले आहे. त्यांनी केलेली टीका नवीन लेखक, कलाकार, दिग्दर्शक यांना नाउमेद करणारी आहे, हे खेदाने नमूद करावे लागते, असे म्हणत माने यांनी गोखले यांनी केलेल्या विधानावर टीका केली आहे.

याचबरोबर, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी देखील ‘भिकार मालिका पाहाव्या की नाही, हा प्रेक्षकांचा चॉईस आहे. गोखलेंना भिकार वाटणाऱ्या मालिका प्रेक्षकांना चांगल्या वाटू शकतात. जे आवडते तेच वाहिन्या दाखवतात,’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रेक्षकांनी मालिका पाहू नये, असे मी म्हणणार नाही. निर्मितीमध्ये दर्जा राहिलेला नाही कारण वाहिनीचे हेड हे हेडलेस आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी विक्रम गोखले यांनी म्हटले की, ‘प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार मालिका पाहणे बंद करा. तुमचा वेळ वाया घालवू नका’.

‘ते पाहतात म्हणून आम्ही काढतो असे म्हणण्याची त्यांना संधी देऊ नका. तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट, लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, मालिका नक्की पहा’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपाबाबत बोलताना विक्रम गोखले यांनी म्हटले की, ‘डिजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढत चालले आहे. तसेच आज पैसे मिळवण्याच्या नादात काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे. यामुळे प्रसारमाध्यमांना चांगल्याचा विसर पडले आहे’, असे त्यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..
वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर नितेश राणेंनी अमित शहांचा फोटो असलेलं ट्विट केलं डिलीट?
‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदमला ३० मुलांनी दिलाय लग्नासाठी नकार, कारण वाचून अवाक व्हाल
झुम मिटींग दरम्यान महिला शिक्षिका गुंतली सेक्समध्ये, धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल

इतर मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now