Share

VIDEO: काय सांगता? हे अमिताभ बच्चन नाही, मग बिग बींसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती कोण? जाणू घ्या

बॉलीवूडचे सुपरहिरो म्हटले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची त्यांचे चाहते पूजा करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासनतास ‘जलसा’ बाहेर उभे राहतात. त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रतीक्षा असते. पण अचानक तुम्हाला बिग बी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून कोणत्याही सुरक्षेशिवाय चालताना दिसले तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल! यावेळीही असेच काहीसे घडत आहे. (Amitabh Bachchan, Shashikant Pedwal, Jalsa)

व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘शहेनशाह’चे चाहते पूर्णपणे हैराण झाले आहेत. अखेर काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ‘अमिताभ बच्चन’ रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणेच त्याची, चालण्याची तीच जुनी शैली दिसून येते. क्षणभर तुम्ही विचार करू लागाल की आजूबाजूला सुरक्षा रक्षक नसताना ते एकटे कसे फिरत आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती अमिताभ बच्चन नाही!

शशिकांत पेडवाल असे या व्यक्तीचे नाव आहे. तो हुबेहूब अमिताभ बच्चनसारखा दिसतो. त्याची हेअरस्टाईल, शरीरयष्टी, सगळं काही बिग बी सारखेच आहे. अशा स्थितीत त्याची पहिली झलक पाहून तुम्हालाही ते अमिताभ बच्चन नाही हे समजू शकणार नाही. या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही मजेदार आहेत. एकाने लिहिले, ‘मला वाटले ते अमिताभ बच्चन आहेत.’ दुसऱ्याने ‘सेम टू सेम’ अशी कमेंट केली. एकाने तर शशिकांतला केस इतके सफेद  करू नका असा सल्लाही दिला आहे.

amitabh bachchan lookalike

शशिकांत पेडवालबद्दल सांगायचे तर, त्याचे इंस्टाग्राम अमिताभ बच्चन यांच्या लूकने भरलेले आहे. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर ४८२ हजार लोक त्याला फॉलो करतात. कधी शाल पांघरून तर कधी बंद गळ्याचा कोट घालून तो पूर्णपणे ‘अमिताभ बच्चन’ बनतो. शशिकांत हे व्यवसायाने प्राध्यापक आहेत. तो पुण्यात राहतो त्याचबरोबर तो कलाकार आणि अभिनेता देखील आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन शेवटचे अजय देवगण सोबत ‘रनवे 34’ मध्ये दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. आता अमिताभ रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय ते ‘गुडबाय’ चित्रपटात नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. बिग बी लवकरच दीपिका पदुकोणसोबत हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये काम करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
चक्क अमिताभ बच्चनलाही पडली महाराष्ट्राची हास्यजत्राची भुरळ, प्रसाद ओकने सांगितला किस्सा
अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात; प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ही अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत या चित्रपटात केलं होतं काम

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now