Share

बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा सुचक इशारा

सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत आक्रमक आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार काल अनेक ठिकाणचे मशिदींवरील भोंगे बंद करण्यात आले. त्यातच आता राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.

शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आता राज ठाकरेंनी आपले पुढचे इरादेही स्पष्ट केले आहेत, असेच दिसते. शिवाय मंगळवारी जारी केलेल्या पत्रातूनच राज ठाकरेंनी शिवसेना आणि थेट उद्धव ठाकरे यांनाही चॅलेंज केलं होतं.

त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे. आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून यानिमित्तानं केला जात असल्याचं जाणकाराचं म्हणणं आहे.

हा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरे बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण हे सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसदार आपणच आहोत, असं बिंबवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. मनसेनं कट्टर हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही मूळ बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका आहे हे ठसवण्याचा प्रयत्न आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1521694002197975040?t=utehsd0Ab0U8vrb_X4pNaw&s=19

बाळासाहेब ठाकरे यांचा या व्हिडीओमधील भाषणाचा पुढचा भाग पाहिल्यानंतर वाटते की, मशिदींवरील भोंग्यानंतर आता रस्त्यावर केली जाणारी नमाज हा मुद्दा मनसे घेईल. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणात नमूद केलेल्या मुद्द्याप्रमाणे राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना त्या अनुशंगानं येत्या काळातही भूमिका घ्यायला लावतील असे दिसते.

मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा विसर पडलाय, हेच दाखवून देण्याचा या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरेंचा खटाटोप असल्याचं दिसते. शिवसेनेची आक्रमकता सत्तेत असल्यापासून मवाळ झाल्याचाही आरोप अनेकदा केला जातो. त्यानंतर आता राज ठाकरेंकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now