Share

कोण आहे नताशा जिच्यावर फिदा झाला गुजरात टायटन्सचा कर्णधार पंड्या? अनेक चित्रपटात केलं आहे काम

गुजरात टायटन्सने IPL 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. संपूर्ण सिजनमध्ये गुजरातसाठी कॉन्सटेंट राहिलेली गोष्ट म्हणजे नताशा स्टॅनकोविक. संपूर्ण सिझनमध्ये गुजरातच्या मॅचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेडियममध्ये उपस्थित होती. चला जाणून घेऊया कोण आहे नताशा.(who-is-natasha-stankovic-gujarat-titans-captain-hardik-pandya)

नताशा(Natasha Stankovic) एक सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हार्दिकने 2019 मध्ये इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने अभिनेत्री नताशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. या फोटोमध्ये हार्दिकने(Hardik Pandya) नताशाचा हात पकडला होता. यासोबतच हार्ट इमोजीही बनवण्यात आले आहे. यानंतरच नताशा खूप लोकप्रिय झाली.

Ipl 2022 Final: Who Is Natasa Stankovic? Captain Of Gujarat Titans Hardik Pandya Wife, How Both Of Them Got Hooked, Know - Ipl 2022 Final: कौन हैं नताशा स्टैनकोविक? जिन पर लट्टू

2020 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली गेली. नताशा एक अभिनेत्री आणि मॉडेल तसेच एक चांगली डान्सर देखील आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नताशा 2012 मध्ये भारतात आली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांसारख्या ब्रँडसह तिने मॉडेल म्हणून सुरुवात केली. त्यांच्या जाहिरातींमध्ये नताशा दिसली होती.

भारतात बिग बॉसच्या आठव्या सीझन आणि बादशाहमधील ‘डीजे वाले बाबू’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. नताशा ‘डीजे वाले बाबू’ गाण्यात दिसली आणि त्यानंतर तीने सोशल मीडियावर(Social media) खळबळ उडवून दिली. ‘डीजे वाले बाबू’ हे गाणे 2014 मध्ये रिलीज झाले होते. त्याच वर्षी नताशा बिग बॉसच्या घरी पोहोचली. मात्र, ती जास्त काळ घरात राहू शकली नाही आणि महिनाभरातच शोमधून बाहेर पडली.

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून नताशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अशातच तिला चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात नताशाने ‘आयो जी’ यावर आयटम डान्स केला होता.

2016 मध्ये सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘7 अवर्स टू गो’ या चित्रपटात नताशाला महिला पोलिसाची भूमिका देण्यात आली होती. त्याच वेळी, 2017 मध्ये स्टॅनकोविकने ‘फुक्रे रिटर्न्स’ चित्रपटात तिने डान्स केला होता. या गाण्याचे नाव होते ‘मेहबूबा’. यासाठी नताशाचे खूप कौतुकही झाले. यानंतर नताशा बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘झिरो’ या चित्रपटातही छोटी भूमिका साकारताना दिसली होती.

Ipl 2022 Final: Who Is Natasa Stankovic? Captain Of Gujarat Titans Hardik Pandya Wife, How Both Of Them Got Hooked, Know - Ipl 2022 Final: कौन हैं नताशा स्टैनकोविक? जिन पर लट्टू

नताशा 2019 मध्ये ‘द हॉलिडे'(The Holiday) या वेब सीरिजमध्येही दिसली होती. नताशा रिअॅलिटी डान्स शो ‘नच बलिए’मध्ये तिचा पार्टनर अली गोनीसोबत डान्स करतानाही दिसली होती. यानंतर नताशा आणि अली गोनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

ताज्या बातम्या खेळ बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now