who is gauri bhide who allegation on uddhav thackeray | गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या चिन्हावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे आणखी एका कारणामुळे चर्चेच आले आले आहे.
एका महिलेने उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. तसेच मुंबईच्या उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका सुद्धा दाखल केली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमके स्त्रोत काय आहे? हा प्रश्न त्या महिलेने याचिकेत उपस्थित केला आहे. तसेच कोरोना काळासंबंधिचाही एक प्रश्न तिने उपस्थित केला आहे. कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा झाला? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
कोरोना काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री होते. २०२० ते २०२२ या काळात त्यांच्या सामना या वृत्तपत्राला कोट्यवधींचा फायदा झाला होता. त्या काळात सामन्याचा टर्न ओव्हर ४२ कोटी इतका होता. ज्यात त्यांचा नफा तब्बल साडे आकरा कोटी होता.
इतका नफा झाला कसा? तसेच उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? असा सवाल त्या महिलेने उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्या महिलेने केली आहे. त्या महिलेचे नाव गौरी भिडे असे आहे.
त्या म्हणाल्या की, २०१९ पासून अनेक गोष्टी समोर आल्या आहे. पब्लिक डोमेनवर काही गोष्टी आढळल्या आहे. मी अनेक वकीलांची भेट घेतली पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मी स्वत:च यावर युक्तिवाद करण्याचा निर्णय घेतला. मी ११ जूलैला तक्रार केली, २६ जूलैला रिमायंड करुन दिलं. पण पोलिसांनी काही केलं नाही. त्यामुळे मला हा मोठा निर्णय घ्यावा लागला.
गौरी भिडे या एक प्रकाशक असून त्यांच्या आजोबांचं राजमुद्रा नावाचे प्रकाशन आहे. त्यांनी मार्मिक आणि सामना हे विकून इतकी संपत्ती कमवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आधी तक्रार दाखल केली होती. पण तक्रार केल्यानंतर कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
आईला डोळ्यासमोर जळताना पाहीलं, मित्रासाठी CM पद सोडलं, वाचा काॅंग्रेस अध्यक्षांची संघर्षगाथा
Oil rate : ऐन दिवाळीत खाद्य तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ; नव्या किंमती ऐकून डोळे पांढरे होतील
Vijay kedia : १९ व्या वर्षी मार्केटमध्ये उतरुन झाले ७९२ कोटींचे मालक, वाचा केडियांच्या गुंतवणूकीच्या ‘या’ भन्नाट पाच टीप्स