Share

रोहितला आणि ईशानला झिरोवर आऊट करणारा चेन्नईचा मुकेश चौधरी आहे तरी कोण? वाचा त्याच्याबद्दल..

जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या विकेट्स घेणे हे कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न असते. ती विकेट विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माची (Virat Kohli) असेल तर ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. असेच स्वप्न चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Chaudhary) पूर्ण केले आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने विराट कोहली आणि रोहित शर्माला एकाच सत्रात बाद करून आयपीएल 2022 संस्मरणीय बनवले आहे.(Who is Chennai’s Mukesh Chaudhary )

मुकेश चौधरीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत ज्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त मयंक अग्रवाल, केन विल्यमसन, शुबमन गिल, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस सारख्या नावांचा समावेश आहे. माजी खेळाडू झहीर खाननंतर भारताला अनेकदा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव भासली आहे. भारताने जयदेव उनाडकट, खलील अहमद या गोलंदाजांना संधी दिली मात्र कामगिरीत सातत्य नसल्याने ते संघात टिकू शकले नाहीत.

आता भारताकडे टी नटराजन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया मुकेश चौधरीलाही संधी देऊ शकते. ‘एल क्लासिको’ सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिली ओवर टाकण्यासाठी आलेल्या मुकेश चौधरीने दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. त्याच ओवरमधील चौथ्या चेंडूवर त्याने इशान किशनला शानदार यॉर्करवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पुढच्याच ओवरमध्ये मुकेशला तिसरी विकेट मिळाली जेव्हा त्याने डेवाल्ड ब्रेव्हिसला आपला शिकार बनवले. तिसऱ्या ओवरमध्ये मुकेशनेही तिलक वर्माला बाद करण्याची संधी साधली, पण स्लिपमध्ये पोस्ट केलेल्या ड्वेन ब्राव्होने त्याचा झेल सोडला. पॉवरप्लेनंतर मुकेशला गोलंदाजी मिळाली नाही आणि त्याने 3 ओवरमध्ये 19 धावांत तीन बळी घेतले. मुकेशच्या या घातक गोलंदाजीमुळे मुंबईला 20 ओवरमध्ये केवळ 155 धावा करता आल्या.

युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीचा जन्म 6 जुलै 1996 रोजी राजस्थानच्या भिलवाडा येथे झाला. तथापि, त्याने 9 नोव्हेंबर 2017 रोजी 2017-18 रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने 7 ऑक्टोबर 2019 रोजी ओडिशा विरुद्ध 2019-20 विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. या व्यतिरिक्त, तो 2019-20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 8 नोव्हेंबर 2019 रोजी रेल्वे विरुद्ध प्रथमच T20 मध्ये खेळला.

IPL 2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने मुकेशला त्याच्या संघासह 20 लाखांच्या मूळ किमतीत सामील करून घेतले. मुकेश चौधरीच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, या 13 सामन्यांमध्ये त्याने 33.44 च्या सरासरीने आणि 62.3 च्या स्ट्राईक रेटच्या मदतीने 38 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने आतापर्यंत 12 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 37.88 च्या सरासरीने आणि 39.4 च्या स्ट्राईक रेटच्या जोरावर 17 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5.75 राहिला आहे.

या युवा वेगवान गोलंदाजाच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो आतापर्यंत 15 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने 27.11 च्या सरासरीने आणि 18.2 च्या स्ट्राईक रेटच्या जोरावर 18 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्याचवेळी रवींद्र जडेजा या सीजनमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

या सीजनमध्ये संघाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 6 विकेटने हरला होता. दुसऱ्या सामन्यात लखनौने 6 गडी राखून पराभवाची चव चाखली होती. तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने त्यांचा 54 धावांनी पराभव केला तर हैदराबादने त्यांचा 8 गडी राखून पराभव केला. चेन्नईने 12 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धचा चौथा सामना जिंकला आणि त्यानंतर गुजरातकडून पराभव पत्करावा लागला.

महत्वाच्या बातम्या-
हार्दिकचे मसल्स पक्षासारखे पातळ, त्याच्यात गोलंदाजी करण्यासाठी जीव नाही, पाकिस्तानी गोलंदाजाचे बेताल वक्तव्य
मुंबईच्या संघात होणार ‘या’ घातक गोलंदाजाची एंट्री, पुन्हा गाजवणार IPL; रोहितने घेतला मोठा निर्णय
दिनेश कार्तिकच्या त्सुनामीमध्ये वाहून गेला बांगलादेशी गोलंदाज, 6 चेंडूत केल्या 28 धावा
रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now