Share

ayesha omar : कोण आहे आयशा उमर? जिच्यामुळे आलाय सानिया मिर्झा आणि शोएब मलिकमध्ये दुरावा

sania mirza shoaib malik

who is ayesha omar | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक सध्या चांगलेच चर्चेत आहे. सानिया पाकिस्तानी क्रिकेटर शोएबपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. अजूनपर्यंत दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण या प्रकरणाशी पाकिस्तानी अभिनेत्रीचा थेट संबंध असल्याचे अनेक युजर्सचे मत आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये, पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने फोटोशूट केले. प्रसिद्ध पाकिस्तानी मॅगझिनसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री आयशा उमर दिसली होती. दोघांचे फोटो आणि पोज खूपच बोल्ड होते आणि त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत होती.

अशा परिस्थितीत घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये आता तेच फोटो व्हायरल झाले आहेत. ज्या व्यक्तीमुळे सानियाचे घर तुटत आहे, ती आयशा उमर असल्याचे मानले जाते. आता या प्रकरणात कितपत सत्यता आहे हे माहित नाही, पण आयशा उमर कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१२ ऑक्टोबर १९८१ रोजी लाहोर, पाकिस्तान येथे जन्मलेली आयशा उमर ही तिथली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आयशा ‘जिंदगी गुलजार है’ या लोकप्रिय पाकिस्तानी मालिकेत झळकली होती. आयशा उमरने लहानपणीच वडिलांना गमावले. ती आणि तिच्या भावाला आईने वाढवले आहे.

आयशा उमरने तिचे शालेय शिक्षण लाहोर ग्रामर स्कूलमधून केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ आर्ट्समधून बॅचलर आणि मास्टर्स पदवी घेतली. आयशा शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भाग घ्यायची. त्यातून ती डान्स शिकली. आयशा उमरने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले.

आयशा उमरने कॉलेज जीन्स या टीव्ही सीरियलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती बुलबुले नावाच्या मालिकेत दिसली. ही पाकिस्तानातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली. २०१२ मध्ये आयशा उमरने जिंदगी गुलजार है या यशस्वी नाटकात काम केले होते.

यामध्ये अभिनेता फवाद खान तिचा भाऊ बनला होता. तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि फवाद कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला आहे आणि आम्ही एकत्र मोठे झालो आहोत. आयशा उमरने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासोबतच पाकिस्तानी चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे.

लव्ह में गम आणि मैं हूं शाहिद आफ्रिदी या चित्रपटांमध्ये तिने आयटम साँग केले होते. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. यानंतर ती २०१७ मध्ये आलेल्या ‘यलगार’ चित्रपटात दिसली होती. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या सात दिन मोहब्बतमध्ये आयशा दिसली होती. तिने २०१८ मध्ये त्याने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.

अभिनेत्री असण्यासोबतच आयशा उमर एक गायिका देखील आहे. मन चला है, भूली यादों में, मांजली, आओ आणि तू ही है यांसारखी गाणी तिने गायली आहेत. याशिवाय ती चित्रकारही आहेत. आयशा उमरने एका मुलाखतीत सांगितले की, मॉडेलिंग आणि अभिनयापूर्वी तिची पेंटिंग आणि गाणे ही आवड होती. लवकरच आयशा फवाद खानसोबत मनी बॅक गॅरंटी या चित्रपटात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
hardik pandya : सुर्यासारख्या हिऱ्याची पारख खूप आधी व्हायला पाहीजे होती पण त्यांनी मात्र..; कोहली-शास्रींना पांड्याने झापले
pratapgad : आता महाराजांच्या गडावरही अतिक्रमन; प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या
Health : ‘हे’ आहेत पाया सुप पिण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचून चकीत व्हाल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now