पंजाबच्या पतियाळामध्ये शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकामध्ये धुमश्चक्री झाली आहे. खलिस्तान दिवस साजरा करण्यावरुन दोन्ही गट आमने सामने आले. २९ एप्रिलला खालिस्तान दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे पतियाळात ‘खलिस्तान मार्च‘च आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक शिवसैनिक व शीख संघटना आमने-सामने आल्यामुळे मोर्चादरम्यान दोन गटांत संघर्ष उफाळून आला . एक गट मोर्चा काढण्याच्या तयारीत होता. याचा काही शीख संघटनी विरोध केला. यानंतर दोन गटांत तणाव वाढला आणि परस्परांवर दगडफेक झाली. दरम्यान यामध्ये एक पोलिस अधिकारी जखमी झाला. पतियाळामधील काली माता मंदिराजवळ ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला.
निहांग शिख यांनी केलेले वादग्रस्त विधान
शुक्रवारी , २९ एप्रिल रोजी निहांग शिख यांनी वादग्रस्त विधान गेलं. तुमच्या दुर्गेला विवस्त्र नाचण्यासाठी कुणी जबरदस्ती केली होती ? तिला कुणी भाग पाडलं होतं ? असं वादग्रस्त विधान त्यांनी प्रो पंजाब टीव्हीसोबत बोलत असताना केले. पुढे ते म्हणाले, गुरु गोविंद सिंग जी यांनी ज्या खालसा पंथाची स्थापना केली , तो सर्व धर्माचा गुरु आहे.
त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे . या वादग्रस्त विधानामुळे हजारो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची टीका सोशल मीडियातून होण्यास सुरुवातही झाली आहे .
पुढे ते म्हणाले,
हिंदू धर्माबद्दल बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे , असं म्हणत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत . हेमकुंठ पर्वतातील वाईट लोकं कोण ? दुर्गेला विवस्त्र नाचायला कुणी भाग पाडल ? तिला वाचवलं कुणी ? हे आधी विचारा ? जेव्हा राक्षसांनी इंद्रदेवाचं घर लुटलं , तेव्हा दुर्गेला विवस्त्र नृत्य करण्यास कुणी भाग पाडलं ? असे सवाल निहंग शिख यांनी केले. पतियाळा मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे गंभीर पडसाद उमटण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.
नेमका वाद काय ?
शिवसैनिकांनी शनिवारी पतियाळा येथे खलिस्तान मुर्दाबाद मार्चचं आयोजन केलं होतं . यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमने- सामने आले होते . त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात तारेवरची कसरत करावी लागली होती . यावेळी पोलिसांसमोरच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली .
काहींनी तर तलवारी काढून हवेत मिरवल्या . त्यामुळे वातावरण आणखी चिघळलं. हिंसाचारानंतर पतियाळ्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून दोषींची धरपकड सुरु होती.पंजाब शिवसेनेचे माजी कार्यकारी प्रमुख हरीश सिंगला यांना अटकही करण्यात आली होती . हरिश सिंगला यांच्यावर बेकायदा मोर्चा काढणे आणि हिंसा भडकवणे , असे आरोप लावण्यात आले आहेत .
महत्वाच्या बातम्या
औरंगाबादच्या सभेआधी मनसेने बदलला झेंडा? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा…, सेनेची वाघीण कडाडली
चंद्रमुखीच्या लव्ह ट्रॅंगल’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; कमाईच्या बाबतीत बाॅलीवूडला टक्कर
मी रूममध्ये एकटाच होतो आणि मनात विचार आला की…; रोहितने सांगितला डिप्रेशनचा भयानक अनुभव