दिल्ली विरोधात सामना रंगत असताना, मुंबई इंडियन्स विजयाचा झेंडा फटकवणार असे, रोहित शर्माला वाटत होते. मुंबईने 178 धावांचे आव्हान दिल्यावर दिल्लीची 5 बाद 72 अशी बिकट अवस्था झाली होती. मात्र, त्यावेळी मुंबईच्या स्वप्नांचा चुराडा ललित यादवने केला,आणि तो मुंबई इंडियन्स चा व्हिलन म्हणून चर्चेत येऊ लागला. कोण आहे का ललित यादव याबद्दल माहिती घेऊ.
इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाला सुरुवात झाली असून, यातील दुसऱ्या सामन्यात चाहत्यांना जबरदस्त रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. बोरबन मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शानदार कामगिरी करत प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही आणि सतत विकेट्स गमावल्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र, जेव्हा सामन्याचा निकाल लागला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण पराभवाच्या बाजूने असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने हे लक्ष्य 10 चेंडू आधी पूर्ण केले आणि सामना 4 विकेटने जिंकला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ललित यादवने 38 चेंडूत 48 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने शार्दुल ठाकूरसह 22 चेंडूत 32 आणि अक्षर पटेलसह 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी करून मुंबईचा विजय हिरावून घेतला.
दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 10 षटकांत 5 बाद 77 अशी होती. अशा स्थितीत दिल्लीने विजयासाठी उरलेल्या 100 धावा 8.4 षटकांत पूर्ण केल्या. ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 23 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
डावाच्या 18व्या षटकात ललित आणि अक्षर जोडीने डॅनियल सॅम्सवर हल्ला चढवला आणि या षटकात 3 षटकार आणि एका चौकारासह एकूण 24 धावा जोडून सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. यामुळे ललित ची सर्वत्र चर्चा होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने 65 लाख खर्च करून ललित यादवला आपल्या संघात समाविष्ट केले होते.
तो 25 वर्षांचा अष्टपैलू खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. फलंदाजीसोबतच तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो. सनरायझर्स हैदराबादनेही ललित यादवला लिलावात आपल्या संघात सामावून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.