Share

सोशल मीडियावर चर्चेत असणारी आलिया भट्टची जाऊबाई नक्की आहे तरी कोण?

नुकतेच बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाबद्दल एकीकडे चर्चा होत असताना, दुसरीकडे आलिया भट्टच्या जाऊबाईबद्दल देखील चर्चा होताना दिसत आहेत.

आलिया भट्टची जाऊबाई म्हणजे कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आम्ही तुम्हांला सांगतो, आलिया भट्टची जाऊबाई म्हणजे अभिनेत्री तारा सुतारिया होय. हो, तारा सुतारिया लवकरच आलिया भट्टची जाऊ होऊ शकते, असे बोलले जात आहे.

सध्या तारा सुतारियाचे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या रिसेप्शन पार्टीतील फोटो सर्वाधिक व्हायरल होत आहेत. तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. आलिया रणबीरच्या रिसेप्शन पार्टीसाठी तारा सुतारिया अतिशय हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात पोहोचली होती. ताराच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला होत आहे.

तारा सुतारिया आणि बॉलिवूड अभिनेता आदर जैन खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आदर हा रणबीर कपूरचा चुलत भाऊआहे. तारा सुतारिया आणि आदर दोघांनाही खाण्याची आवड असल्याने ते अनेकदा रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर जात असतात. तसेच ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.

तारा आणि आदर ही जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि प्रत्येकजण आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे आता तारा लवकरच आलिया भट्टची जाऊबाई बनू शकते. अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. असे बोलले जात आहे की, पुढच्या वर्षी हे दोघे लग्नबंधनात अडकू शकतात.

आदर हा रिमा कपूर यांचा मुलगा असून रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर त्याची चुलत भावंडं आहेत.14 एप्रिलला  मुंबईतल्या वांद्रे येथील ‘वास्तू’ बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा पार पडला. रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती. आलियानं लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी नेसली होती.

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now