मुंबई। टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला या नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. कधी आपल्या स्टायलिश लुकमुळे तर कधी नवीन-नवीन सुपरहिट गाण्यांमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. दिव्या खोसला या अनेक वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होताना दिसतात.
दिव्या खोसला यांना सुपरहिट गाण्यात आपली अदाकारी दाखवतांना, तर कधी रॅम्प वॉक करतांना तुम्ही नक्कीच पहिले असेल. दिव्याने आपल्या अदाकारांनी लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे. या सोशल मिडीयावर देखील चांगल्याच सक्रीय असतात. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील भला मोठा आहे.
मात्र आता दिव्या खोसला या कोणत्या गाण्यामुळे नाही तर एका उफ्फ मोमेंटमुळे चर्चेत आल्या आहेत. बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीबरोबर काही ना काही उफ्फ मोमेंट घडतोच. त्यावेळी त्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील होतात. असाच काहीसा प्रकार आता दिव्याबरोबर देखील घडला आहे. मात्र या उफ्फ मोमेंटमुळे दिव्या सोशल मिडीयावर ट्रोल झाली नसून तीच कौतुक करण्यात येत आहे.
२०२० साली लॅक्मे फॅशन विक मध्ये रॅम्प वॉक सोहळा पार पडला होता. यावेळी दिव्या खोसला यांनी देखील सहभाग नोंदवला होता. दिव्या खोसला यांनी हैदराबाद मधील फेमस फॅशन डिजाईनर कृष्ण कॉचर (Krushn Couture) यांच्यासाठी रॅम्प वॉक केला होता. या रॅम्प वॉकसाठी त्यांनी खास आउटफिट निवडले होते.
यावेळी रॅम्प वॉक करतांना दिव्या खोसला कमालीच्या सुंदर दिसत होत्या. मात्र त्यांच्या आनंदाला कुणाची तरी नजर लागली असावी. कारण याचवेळी त्यांच्यासोबत उफ्फ मोमेंट घडला. दिव्या खोसला या रॅम्प वॉक करत असतांना त्यांनी परिधान केलेला स्कर्ट त्यांच्याच पायात अडकला. यामुळे त्यांच्या स्कर्टचे बटन तुटले.
मात्र तरीही त्या डगमगल्या नाहीत त्यांनी बिघडलेली परिस्थितीत उत्तम प्रकारे सांभाळून घेतली. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर आणि कॅमेरा समोर अशी गोष्ट होऊन सुद्धा त्यांनी आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. उलट त्यांनी आपल्या हाताने आपला स्कर्ट पकडला आणि आपला वॉक पूर्ण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच लाजेचा लवलेशही नव्हता. उलट त्या मस्त स्माईल करत होत्या.
या रॅम्प वॉकच्या वेळी त्यांनी खास आउटफिट निवडले होते. या क्षणी त्यांनी हेवी टू पीस एमब्लिश्ड स्कर्ट सेट परिधान केला होता. हे आउटफिट सगळ्यांनाच कॅरी करता येत नाही, पण दिव्या खोसला यांना विश्वास होता की त्या अगदी सहजपणे हे आउटफिट कॅरी करू शकतात आणि त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली. तसेच बिघडलेली परिस्थिती त्यांनी उत्तम पद्धतीने सांभाळली. त्यांच्या या कलेमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
हेवी टू पीस एमब्लिश्ड स्कर्ट सेट च्या या सुंदर लेहेंग्यावर ओवरऑल सीक्वंस वर्क केले गेले होते. ज्याच्या वेस्ट पार्ट वर हेवी सीक्वंस वर्क सुद्धा होते. दिव्या यांनी आपला हा लुक पूर्ण करण्यासाठी कुंदन आणि ग्रीन स्टोन स्टडिड दागिने घातले होते. यामुळे त्यांना एक रॉयल लुक मिळला होता. यावेळी त्यांना पाहून लाखो चाहते फिदा झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला ‘द काश्मीर फाइल्स’ देणार टक्कर..! पहिल्याच दिवशी केली एवढ्या कोटींची कमाई
हवा उतरली! भुबन बड्याकरने ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले, ‘गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकेन’
धक्कादायक! गुटखा तोंडात टाकला अन् लागला ठसका, तरूणाचा जागीच मृत्यु, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पूनम पांडेचे ‘हे’ पाच बोल्ड चित्रपट तुम्ही पाहिलेत का? एकात तर शक्ती कपूर यांच्यासोबत केलाय रोमान्स