महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ट्रेकिंग करत असताना मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. मधमाशांचा हल्ला इतका जोरदार होता की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. तर त्यामध्ये 21 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 19 मुली, तर दोन मुले आहेत.(while-trekking-in-pune-children-were-attacked-by-bees)
रुग्णालयात सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता आठवी आणि नववीचे 64 विद्यार्थी चार शिक्षक आणि अन्य चार कर्मचारी दुपारी चार वाजता अंबा-अंबिका गुहेजवळ ट्रेकिंग करत होते, त्याचदरम्यान ही घटना घडली.
त्यांना नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी सांगितले. विघ्नहर नर्सिंग होमचे विष तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत(Dr. Sadanand Raut) यांनी सांगितले की, या विद्यार्थिनींनी उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब कमी होणे अशा तक्रारी केल्या आहेत. या नर्सिंग होममध्ये मुलांवर उपचार केले जात आहेत.
राऊत म्हणाले, “मधमाश्यांनी चावा घेतलेल्या 21 मुलांपैकी 19 मुली आहेत. या सर्व 21 पैकी 6 जणांची प्रकृती रक्तदाब कमी झाल्यामुळे जवळपास चिंताजनक आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.” मधमाशांच्या हल्ल्यामुळे इतर विद्यार्थी आणि इतर लोकही घाबरले आहेत.






