Share

सुखी संसार चालू असताना अचानक झाला पतीचा मृत्यु, मग पत्नीच्या आयुष्याला आले वेगळे वळण

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीचं एका मुलासोबत प्रेम जडलं.तो मुलगा तिच्या शेजारीच राहत होता. त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं मात्र घरच्यांनी विरोध केल्याने, ते पळून गेले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. कुटूंब अगदी आनंदात होते. मात्र, एक दिवस या तरुणीच्या आयुष्यात मोठा भूकंप आला. त्यानंतर तिचे आयुष्य बदलून गेलं.

घटना दिल्ली मधील असून, Humans Of Bombay च्या इन्स्टाग्राम पेजवर महिलेच्या हवाल्याने शेअर करण्यात आली आहे. तिची पूर्ण कहाणी एकूण तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या कहाणी मधून तिने इतर महिलांना देखील मोलाचा संदेश दिला आहे, तो पोहोचण्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

तिच्या आयुष्याची कहाणी अशी की, तरुणी 15 वर्षांची असताना तिचं शेजारी राहणाऱ्या एका मुलावर प्रेम जडलं. मुलगा दुसऱ्या जातीतीलआहे म्हणून घरच्यांची त्यांच्या प्रेमाला विरोध केला. मात्र दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. त्यांनी या प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्याचं ठरवलं. त्यासाठी ते दोघे घरातून पळून गेले.

मुलाचे नाव मयूर होते. त्याचं देखील तिच्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी लग्न केलं. त्यांनतर मोठ्या हिमतीने, कष्ट करून आपला संसार दोघेजण करू लागले. त्यांच्या प्रेमात नंतर ‘जात’ कधीच आडवी आली नाही. सुखाचा संसार चालू असताना त्यांना दोन गोंडस मुली झाल्या.

दाम्पत्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं. कालांतराने कुटुंबातील इतर सदस्यांपासूनचं अंतरही कमी झालं. पण एक दिवशी तिचा पती मयूर झोपला आणि परत कधीच उठला नाही. त्याने अचानक सर्वांना परकं करून जग सोडलं. मयूरचं निधन होताच पत्नीला आयुष्य संपल्यासारखं वाटू लागलं. वयाच्या 32 व्या वर्षी 2 मुलींना एकटीनं कसं वाढवायचं? या विचाराने ती घाबरली.

मात्र, तिच्या मुलींनी तिला समजावलं,’वडील कायम आपल्या हृदयात असतील मात्र आता आपल्याला आयुष्यात पुढं जायचं आहे’ असे मुलींनी आईला सांगितलं. मुलींच्या या शब्दांनी प्रेरित होऊन तिनं त्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलली. बघता बघता सात वर्षे सरली. याच काळात महिलेच्या आयुष्यात एक व्यक्ती आला. ज्याने त्यांचं घर पुन्हा आनंदात भरलं.

एक दिवशी महिलेची तिचा बालपणीचा मित्र मुकेशसोबत एका लग्नात भेट झाली. त्यानंतर त्यांचं बोलणं झालं. महिलेनं तिच्या आयुष्याची पूर्ण कहाणी त्याला सांगितली. मुकेशनं महिलेमध्ये रस दाखवला. आयुष्यभराची साथ देईल असे वचन तिला दिलं. महिलेनं खूप विचार करून, मुलींसोबत बोलून त्याच्यासोबत लग्न करायचं ठरवलं. महिलेनं यावेळी सर्वांना सल्ला दिला की, ‘तुमच्या नशिबात प्रेमाची दुसरी संधी असेल तर ती वाया घालवू नका!’

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now