Share

ऋषी कपूरचा विषय निघताच भावूक झाल्या नीतू कपूर, रडत-रडत म्हणाल्या, रोज कोणी ना कोणी..

नीतू कपूर सध्या ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’ या शोला जज करत आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नीतू ऋषी कपूरची आठवण करून भावूक झालेली दिसत आहे. खरंतर, शोमध्ये एका स्पर्धकाची आज्जी ऋषी कपूरबद्दल काही सांगते, जी ऐकून नीतू भावूक होते.(while-talking-about-rishi-kapoor-in-the-show-neetu-became-emotional)

स्पर्धकाची आज्जी म्हणते की, ‘माझे पती ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांना 1974 मध्ये भेटले होते आणि ते अनेकदा माझ्याशी त्यांच्याबद्दल बोलतात. ऋषीजींनी माझ्या पतीला खूप साथ दिली. यानंतर तिने ‘रेश्मा’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ हे गाणे गायले, जे ऐकून नीतू कपूरच्या डोळ्यात पाणी आले.

नीतू कपूर शोमध्ये म्हणते, ‘ऋषी जी आता नाहीत, पण मी रोज कोणाला ना कोणाला भेटते आणि कोणीतरी मला त्यांची आठवण करून देते. प्रत्येकाची त्यांच्यासोबत एक कथा आहे. ऋषीजी माझ्याशी कुठूनतरी जोडलेले आहेत. नीतूचे हे शब्द ऐकून शोचा होस्ट करण कुंद्रा म्हणतो, ‘काही लोक हृदयात जागा बनवतात आणि काही लोक ऋषीजींसारखे हृदय बनतात’.

https://youtu.be/rQmVYJLqVmU

नीतू कपूरने ‘डान्स दिवाने ज्युनियर्स'(Dance Deewane Juniors) या नृत्यावर आधारित शोमधून टीव्हीवर पदार्पण केले आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

ऋषी कपूर या जगात नसले तरी चाहते आजही त्यांची खूप आठवण काढतात. नीतू कपूर लवकरच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूरसारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now