मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याद्वारे तो अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. यामध्ये कधी तो मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो तर कधी जेनेलिया आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या या पोस्ट्सना चाहत्यांकडूनही खूप पसंती मिळत असते. आताही रितेशने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रितेश त्याच्या दोन्ही मुलांसोबत आयपीएल क्रिकेटचा सामना एन्जॉय करताना दिसून येत आहे. व्हिडिओत रितेश त्याच्या दोन्ही मुलांच्या भावना दाखवत आहे. व्हिडिओत गुजरात टायटन्स टीम आयपीएल सामना जिंकल्याने रितेशचा एक मुलगा राहिल खूपच आनंदी असल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे आपला आवडता कोलकाता नाईट रायडर्स टीम हरल्याने रितेशचा दुसरा मुलगा रियान खूपच उदास झाल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करत रितेशने लिहिले की, गुजरात टीम जिंकल्याने राहुलने आनंद साजरा केला. तर केकेआर हरल्याने रियान नाराज झाला आहे. मी कोणाचीच बाजू घेऊ शकलो नाही. पण मी माझ्या आवडत्या व्यक्तींसोबत क्रिकेट या खेळ एन्जॉय केला.
रितेशचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत ११ लाखापेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओवर त्याचे चाहते अनेक कमेंट करत आहेत. एकाने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, मुलांची प्रतिक्रिया नेहमी मन जिंकून घेणारी असते. दुसऱ्या एकाने लिहिले की,
गुजरात टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजद्वारेही रितेशच्या या व्हिडिओवर कमेंट करण्यात लिहिण्यात आले की, ‘आयपीएल म्हणजे हेच. दोघांनाही आमच्या शुभेच्छा द्या. आणि रियानला सांगा की, ‘हार कर जीतने वालों को बाजीगर कहते है’. यादरम्यान रितेशच्या या पोस्टवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेही कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली.
जेनेलियाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘वेल डन बाबा… आजचे कर्तव्य पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद’. जेनेलियाच्या या कमेंटवर रितेशनेही मजेशीरपणे उत्तर दिले. त्याने लिहिले की, ‘आता तुझा नंबर.. पुढील महिनाभर आता यांचा तू सांभाळ कर’. यासोबत रितेशने अनेक हसण्याच्या इमोजीसुद्धा पोस्ट केले. रितेशने जेनेलियाला दिलेल्या या उत्तरालाही चाहते खूप पसंती देत आहेत. तसेच दोघांनी चांगली डील केल्याचेही म्हणत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO : आईचे आणि भावाचे फोटो काढणाऱ्यावर भडकला तैमुर; म्हणाला, ‘बंद करो दादा, बंद करो’
मराठमोळ्या अभिनेत्रीने केले बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू वाघीण आहेस..’
मंगेशकर कुटुंबीयांची ‘ही’ भूमिका अगम्य, हा १२ कोटी मराठी माणसांचा अपमान; आव्हाड भडकले