heart attack : नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये ठिकठिकाणी गरबा, दांडिया खेळला जातो. प्रचंड उत्साहात गरबा, दांडियाचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेताना दिसतात. तहानभूक विसरून मोठ्या उत्साहात गरबा दांडिया खेळताना घामाने भिजलेले तरुण – तरुणी दिसले तर त्याचे नवल वाटत नाही. मात्र हाच गरबा, दांडिया एका कुटुंबासाठी दुःखद ठरला. याबाबतची धक्कादायक घटना विरारमध्ये घडल्याचे समोर येत आहे.
विरारमधील ग्लोबल सिटी या सोसायटीत राहणारा मनीष जैन हा तरुण आपल्या सोसायटीच्या खाली रात्री गरबा खेळत होता. अचानक हार्ट अटॅक आल्याने तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर लगेच त्याच्या वडिलांनी आणि शेजारच्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले.
मनीषला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तरी देखील पोहोचण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता. उपचार मिळण्याआधीच आपल्या मुलाने जीव सोडला. हे कळताच मनीषच्या वडिलांना देखील हार्ट अटॅक आला. आणि त्यामध्ये त्यांचे देखील निधन झाले आहे.
असा अचानक एकाच कुटुंबातील त्या दोघांचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्देवी घटनेत पिता- पुत्राला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे गरबा खेळत असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली. मुंबई आणि परिसरात या धक्कादायक घटनेबाबत चर्चा होत आहे.
दरम्यान अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील करंजा लाड येथील रहिवासी गोपाल इत्रानी यांना रात्री गरबा खेळत असताना अचानक हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. 30 सप्टेंबर रोजी घडली होती.
त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी देखील वाशिममध्येच शांतीनगर भागात सुरेश काळे नावाच्या व्यक्तीचा गरबा खेळत असताना अशाच प्रकारे मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात काहीसे भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले. गरबा, दांडिया उत्साहात खेळणं या लोकांना चांगलंच महागात पडलं. अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या गंभीर घटनांनंतर पुन्हा हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, ही गोष्ट प्रामुख्याने समोर येत आहे. सामान्य लोकांपासून ते मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत हृदयाच्या समस्या निर्माण होऊन अचानक त्रास झाल्याने मृत्यू होताना मागील काळात लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्याबाबत योग्य ती दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
bjp : भाजपने शिंदे गट फोडला! मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदाराला भाजपात घेतलं; वाचा नेमकं काय घडलं?
pune : ६०० किलो स्फोटकांनीही चांदनी चौकातील पुल पडला नाही, पुण्यात मनसेची सत्ता आल्यास…वसंत मोरेंची घोषणा
milind narvekar : एकनाथ शिंदे तोंडावर पडले; मिलिंद नार्वेकर रात्री अचानक शिवाजी पार्कमध्ये, वाचा नेमकं काय घडलं?