मध्य प्रदेश(Madhya Pradesh): मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गुरुनानक मार्गावरील एक जुने घर पाडण्यात आले. तेव्हा तेथील ढिगारे हटवताना सुमारे ६० लाख रुपये किमतीची ८६ सोन्याची नाणी कामगारांना सापडली. १९ आणि २१ ऑगस्ट रोजी २,६०० चौरस फूट जागेत पाडकाम करताना कामगारांना खजिना असलेले धातूचे भांडे सापडले. ती नाणी मजुरांच्या हाती लागताच त्यांनी ती आपापसात वाटून घेतली.
ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आठ मजुरांना अटक केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) देवेंद्र पाटीदार यांनी रविवारी सांगितले की, मजुरांनी पोलिसांना न कळवता आपापसात सोन्याची नाणी वाटून घेतली. ही नाणी पुरातन काळातील असल्याने महत्त्वाची असू शकतात. काही दिवसांपूर्वी जुन्या नाण्यांमधून ही नाणी कामगारांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मजुरांकडून एकूण एक किलो वजनाची ८६ सोन्याची नाणी जप्त केली. नाण्यांची किंमत सुमारे ६० लाख रुपये आहे, परंतु पुरातत्वीय महत्त्व शोधल्यानंतर त्याची किंमत १ कोटी रुपयांपर्यंत असू शकते, असे पोलिसांनी सांगितले. धार येथील एका जीर्ण घराच्या उत्खननात काम करणाऱ्या मजुरांना काम सुरू असताना सोन्याचे दागिने आणि नाण्यांनी भरलेले भांडे सापडले.
दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मजुरांना सुमारे १०० नाणी आणि सोन्याच्या साखळ्या सापडल्या. एवढा खजिना एकत्र पाहून मजुरांच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्यांनी जमीनदाराला न सांगता आपापसात वाटून घेतले. काही दिवसांपासून हे मजूर सोने विकून आरामात जीवन जगत होते, मात्र त्यांच्या मोठ्या खर्चामुळे ते पोलिसांच्या निशाण्यावर आले.
पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली. पुरातत्व विभागाकडून त्याच्या पुरातन वास्तूची माहिती घेतली जात आहे. एका मजुराने बाजारात नाणे विकले. मिळालेल्या पैशातून मोटारसायकल घेतली आणि ५० हजार रुपये खर्च करू लागला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या हाती लागले. पुरातन काळातील अनेक वस्तू अशाच चोरून किंवा मग कमी किमतीत विकून पैसे मिळवण्याच्या घटना वाढतच आहे. तसेच वारसा जपण्यासाठी आजही कित्येक घरांमध्ये अशा अनेक प्राचीन काळातील वस्तू सुरक्षित ठेवलेल्या दिसतात.
महत्वाच्या बातम्या
खुद्द शरद पवारांनीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचा काय म्हंटलंय?
उद्धव ठाकरेंनी कोकणातील बड्या नेत्याला मातोश्रीवर बोलावून झाप झाप झापले; सेनेत पुन्हा राडा
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक! बाबूजमाल दर्ग्यावर का आहे गणेशाची मूर्ती?, वाचा सविस्तर
सत्तेचा माज..! शिवसेना कोणाची? देखाव्यावर शिंदे सरकारची कडक कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?