Share

अजय देवगणवर टीका करताना KRK कडून झाली मोठी चूक, लोकांनी केले ट्रोल, म्हणाले…

देशातील सर्वात वादग्रस्त क्रिटिक कमाल रशीद खान(Kamal Rashid Khan) यांना केआरके या नावानेही ओळखले जाते. केआरके अनेकदा चित्रपटाच्या रिव्ह्यू आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतो. अलीकडेच त्याने बॉलिवूड स्टार अजय देवगणवर निशाणा साधला आहे.(while-criticizing-ajay-devgn-krk-made-a-big-mistake-people-made-trolls)

केआरकेने(KRK) अजयबद्दल दोन ट्विट केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. या ट्विटमध्ये, ब्लॉकबस्टर चित्रपटाला सुपर फ्लॉप म्हणत अजय देवगणच्या दिग्दर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने केआरके स्वतः ट्रोलर्स निशाण्यावर आला.

केआरकेने मंगळवारी अजय देवगणच्या(Ajay Devgan) भोला या चित्रपटाबाबत एकामागून एक ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये अजय देवगणवर हल्ला करत केआरकेने भाकित केले की त्याच्या दिग्दर्शनाखाली बनणारा पुढचा चित्रपटही सुपर फ्लॉप ठरेल.

केआरकेने लिहिले की, ‘अजय देवगण त्याचा चौथा चित्रपट भोला दिग्दर्शित करत आहे. यापूर्वी त्याने 3 चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि सर्व डिजास्टर ठरले. पण अजयने ठरवले आहे की, तो कायम हिट चित्रपट देत राहणार आहे. भोला(Bhola) हा चित्रपट तामिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे जो सुपर फ्लॉप ठरला होता.’

कैथी(Kaithi) हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरताच केआरके ट्रोल्सच्या निशाण्यावर आला. या सुपरहिट चित्रपटाच्या समर्थनार्थ लोकांनी केआरकेला खरे खोटे सुनावले. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनचा स्क्रीनशॉट शेअर करताना एका यूजरने केआरकेला प्रश्न विचारला की हा फ्लॉप कसा आहे?

त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, चित्रपटाचे बजेट 25 कोटी होते आणि त्याने 110 कोटी कमावले. त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सतत ट्रोल झाल्यानंतर केआरकेने आणखी एक ट्विट करून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

या ट्विटमध्ये त्याने आपण साऊथचे चित्रपट पाहत नसल्याचे सांगितले आहे. त्याने ट्विट केले की, ‘अनेक लोक म्हणत आहेत की कैथी हा एक हिट चित्रपट होता. मी साऊथचे चित्रपट पाहत नाही, जर हा चित्रपट हिट झाला असेल तर तो खूप चांगला आहे पण त्याचा हिंदी रिमेक डिजास्टर ठरेल.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now