Share

Nilesh rane :..ठाकरे कुटूंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, राणेंचे खळबळजनक विधान

ठाकरे आणि राणे घराण्यातील वाद राजकीय वर्तुळात नवा नाही. अनेक दिवसांपासून ठाकरे विरुद्ध राणे असा वाद प्रतिवाद राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. आता नुकतेच भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यापुढे उद्धव ठाकरे राणे कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर जाहीर सभा घेऊन सगळंच बाहेर काढेल असा इशारा निलेश राणे यांनी यावेळी दिला आहे. राणेंच्या नादाला लागू नका असे निलेश राणे म्हणाले आहेत. यावेळी ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. निलेश राणे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्राला काही गोष्टी कळल्या पाहिजेत, यासाठी मी एक ट्विट केलं आहे. कधीकधी असे प्रसंग येतात की बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो, असे राणे म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, आमच्या नादाला लागू नका, उगाच फाटक्यात पाय घालू नका. ठाकरे उगाच वायफळ बोलत बसले, तर ऐश्वर्या ठाकरे कोण? सोनू निगम काय करत होता, या सगळ्या गोष्टी बाहेर निघणार हे ठाकरेंनी लक्षात ठेवावं. जाहिरपणे सभा घेऊन सगळ्याच गोष्टी उघड करू, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच म्हणाले, चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा ठाकरे कुटुंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला, हे महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे तसेच माँ साहेब जेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, का गेल्या? तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर कोण का नव्हतं हे एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे, असे सवाल त्यांनी केले.

ठाकरेंनी फाटक्यात पाय घालू नये, एवढे फाडले जाल की शिवायला कोणी येणार नाही. ठाकरेंनी त्यांची औकात ओळखावी ते शून्य झालेले आहेत. त्यांना कोण कुत्रंही विचारत नाही, अशी जहरी टीका यावेळी निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

तसेच जे कुत्रे आमच्यावर भुंकायला ठेवलेत त्यांनाही आवरा. नाहीतर सभा घेऊन उभी आडवी फाडेन हे लक्षात ठेवा, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला. निलेश राणे यांनी ठाकरेंवर टीका करताना एवढे सारे प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात सध्या त्याचीच चर्चा आहे. आता निलेश राणेंच्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now