भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर तब्बल दोन वेळा हल्ला झाल्यामुळे या प्रकरणात सीआयएसएफने गंभीर दखल घेतली आहे. सीआयएसएफने थेट मुंबई पोलिसांना हल्ल्याविषयी जाब विचारला आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी देखील सीआयएसएफला जशास तसे उत्तर दिले आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सीआयएसएफच्या महासंचालकांना पत्र लिहीत “किरीट सोमय्यांवर हल्ला होताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करा” असे सांगितले आहे. या पत्रासंदर्भातली माहिती सूत्रांकडून आली आहे.
सोमय्यांना केंद्राने झेड सिक्युरिटी दिली आहे. त्यामुळे हल्ला होताना त्यांच्यासोबत सीआयएसएफचे जवान असणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी ते उपस्थित नसल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी CISF महासंचालकांना पत्र लिहीत याबाबत चौकशी करण्यास सांगितली आहे.
त्यामुळे आता या पत्राला CISF महासंचालकांकडून काय उत्तर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या किरीट सोमय्या यांच्या हल्लेप्रकरणात केंद्र सरकार विरोधात मुंबई पोलीस असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत किरीट सोमय्यांवर दोन वेळा हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी शिवसैनिकांना जबाबदार धरले आहे.
दरम्यान सर्वात पहिला हल्ला किरीट सोमय्यांवर महापालिकेच्या बाहेर झाला होता. यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या राणा दांपत्याला भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात जात असताना त्यांच्यावर दुसरा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
त्यामुळे एका मंत्र्यावर दोन वेळा हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे CISF ने म्हणले आहे. तसेच, CISF ने झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर दोन वेळा हल्ला कसा होऊ शकतो या संदर्भात मुंबई पोलिसांना जाब विचारला आहे. या प्रश्नाला आता मुंबई पोलिसांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘शेर शिवराज’ने फक्त ४ दिवसांतच जमावला ‘एवढ्या’ कोटींची गल्ला, सगळे शो हाऊसफुल
मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर
बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते शुभेंदू अधिकारींचे बंडखोरीचे संकेत; भाजपमध्ये खळबळ
नितेश राणे यांना आपल्याच मतदार संघातील गावात जाण्यास बंदी, धक्कादायक कारण आले समोर