Share

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हटवला युक्रेनमधील ‘हा’ येशूचा पुतळा, वाचा यामागचे मुख्य कारण

युक्रेनवर हल्ला करत रशिया युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशियाच्या हाती काही यश लागेनासे झाले आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे फक्त नागरिकच नाही तर, युक्रेनमधील ल्विव्ह येथील अर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा सुध्दा हटवून अज्ञात स्थळी ठेवण्यात आला आहे.

दुसऱ्या महायुध्दानंतर पहिल्यांदाच हा पुतळा त्याच्या मुख्य स्थानावरून हटविण्यात आला आहे. सांगण्यात येत आहे की, दुसऱ्या महायुध्दानंतर या पुतळ्याला चर्चमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्या पुतळ्याची जागा कोणीच बदलली नाही. मात्र आता युध्दाची भिषण स्थिती पाहता या पुतळ्याला जागेवरुन हटवण्यात आले आहे.

ज्यावेळी युध्द संपेल तेव्हा हा पुतळा पुन्हा मुख्य जागी ठेवण्यात येईल का, याबाबत कोणालाच माहिती नाही. येशू ख्रिस्ताचा पुतळा अनेकांचे श्रध्दास्थान आहे. याठिकाणी युक्रेन नागरीक अगदी भक्तीभावाने येतात. येशु आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करेल आणि आपले दुख संपेल असा विश्वास नागरिकांना आहे.

दरम्यान युक्रेनमधील युध्दस्थिती पाहता खासदार येवगेन शेवचेन्को यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. युक्रेनियन सरकारच्या आदेशानुसार, शेवचेन्को यांना देश सोडण्याचा अधिकार नाही. अनिवार्य लष्करी सेवेनुसार ते युद्धाच्या वयाचे असल्यामुळे त्यांना देश सोडण्यास परवानगी नाही.

परंतु तरी देखील त्यांनी हा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे युक्रेनने रशियन लष्कराच्या मेजर जनरलला ठार केल्याचा दावा करण्यात येत आहे. जनरल विटाली गेरासिमोव्ह यांचा युद्धात मृत्यू झाला आहे. मात्र, रशियाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

युक्रेनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तेथील नागरिक सुध्दा देश सोडून जाण्याच्या निर्णयावर ठाम झाले आहेत. युक्रेनमधून बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या 15 लाख 30 हजारांवर येऊन पोहचली आहे. अजून देखील लोक देश सोडून जात असल्याची माहिती राष्ट्रांच्या निर्वासित विषयक संस्थेने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
PHOTO: कोण आहे सपना भाभी जिच्या हॉट फोटोंनी सोशल मिडीयावर घातलाय धुमाकूळ?
ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?
दोन महिलांसोबत एकाचवेळी मसाज घेत होता शेन वॉर्न, CCTV फुटेज आले समोर
शेन वॉर्नचा ‘तो’ अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट, चाहते देखील हळहळले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now