शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढंच नाहीतर ईडीवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेत अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावर भाजप नेत्यांनी राऊत यांना प्रतिउत्तर दिले. त्यात भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत टिका केली आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे नेते कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले केंद्रीय एजन्सींचा वापर करून त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाडायचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेनंतर आता भाजपच्या नेत्यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!’असे ट्विट करत संजय राऊतांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1493551254240624642?t=r8IPtiBhRA-b0YnbO_UBGw&s=19
तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं की, ही पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ ड्रामा आहे. सरकारमध्ये स्थान नसल्यानं संजय राऊत विचलित आहेत. संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद फेल गेली आहे. खोदा पहाड, निकला चुहा, अशी पत्रकार परिषद झाली आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1493552356805722116?t=tXwNefDZi69uZU5SckLd1A&s=19
तर नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात ट्विट केलं आहे. ‘चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब..याला म्हणतात लोंबत्या राऊत’ अशा शिवराळ भाषेत राणे यांनी टीका केली. त्यामुळे आता हे आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय चक्र कधी थांबणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष आहे.