सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही. मात्र त्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. आज त्याच्या मृत्युला २ वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्ताने अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये रिया चक्रवर्ती, सुशांतची बहिण इ. लोकांचा समावेश आहे.
हे सगळ्यांना माहिती आहे की सुशांतचे अंकितासोबतही रिलेशनशिप होते. पण जेव्हा सुशांतच्या मृत्यु झाला त्याच्या काही दिवसांनी अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ टाकला होता ज्यामुळे सुशांतचे चाहते भडकले होते. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचे रिलेशनशिप ६ वर्षे चालले. आता सध्या अंकिता विकी जैन सोबत लग्न झालं आहे आणि सध्या ती स्मार्ट जोडीमुळे चर्चेत आहे. दोघांनी स्मार्ट जोडी हे टायटल जिंकले आहे.
तीने काही दिवसांपुर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती विकी जैन सोबत डान्स करताना दिसत आहे. पण ही व्हीडिओ चाहत्यांना काही आवडली नाही आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
काहींनी तर अश्या कंमेंट्स केल्या की, बरं झालं तुझं हे रूप सुशांतने पाहिले नाही. सुशांतच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर आपली नाराजगी बोलून दाखवली होती. पण हा प्रकार पहिल्यांदाच घडलाय असे नाही. याआधीही वेगवेगळ्या कारणाने अंकिता ट्रोल झाली होती.
दिवाळीत अंकिताने काही फोटो शेअर केले होते ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या की, इतक्या लवकर सुशांतला विसरलीय का? जस्टीस फॉर सुशांत सिंह राजपुतचे काय झाले? असा सवाल नेटकऱ्यांनी तिला केला होता.
२००९ मध्ये सुशांतची आणि अंकीताची भेट झाली होती. त्यानंतर दोघेही ६ वर्ष एकत्र होते. २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकप झाले होते. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर अंकिता पुन्हा चर्चेत आली होती. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ती पुढे आली होती आणि तिने अनेक प्रकारे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता.