Share

शाहरूख खानने जेव्हा होळीच्या दिवशी दिव्या भारतीला केलं होतं प्रपोज, असा चढला होता प्रेमाचा रंग

शाहरुख खानला बॉलिवूडचा सर्वात रोमँटिक हिरो म्हटले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘जब तक है जान’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने चाहत्यांना प्रेम व्यक्त करण्याचे नवीन मार्ग शिकवले. पण त्याच्याकडे असाच एक चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी होळीचा दिवस निवडला होता. या चित्रपटातही त्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा वापर केला आहे.(When Shah Rukh Khan proposed to Divya Bharati on the day of Holi)

आम्ही बोलत आहोत त्याच्या ‘दीवाना’ (शाहरुख खान डेब्यू फिल्म) या चित्रपटाबद्दल. यामध्ये तो एका विधवा महिलेची भूमिका करणाऱ्या दिव्या भारतीला प्रपोज करताना दिसत आहे. शाहरुख खानने ‘दीवाना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांच्याही मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

या चित्रपटात शाहरुखने राजा सहाय नावाच्या तरुण मुलाची भूमिका साकारली होती, जो एका विधवा मुलीच्या प्रेमात पडतो. खूप धाडस करून राजा होळीचा दिवस निवडतो. होळीच्या निमित्ताने या दृश्याशी संबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

https://youtu.be/RYgr-yxQHhg

शाहरुख खान हळूहळू दिव्या भारतीकडे सरकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तिच्याकडे रागाने पाहतो. मग आपले प्रेम पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहे. तो म्हणतो, मी असहाय्य आहे. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. यावर दिव्या म्हणाली, पण आम्ही तुझ्यावर प्रेम  करत नाही. तेव्हा शाहरुख म्हणतो, पण तु कोणालातरी तुमच्यावर प्रेम करण्यापासून रोखू शकत नाही.

शाहरुख खान पुढे म्हणतो, मी काय करू? मला सांगा की मी काय करावे जेणेकरून तुला माझ्या प्रेमाची खात्री होईल. मी माझा जीव देऊ का? मी मरू का? यानंतर दिव्या म्हणते, मी असं म्हटलं नाही. यानंतर दोघांच्या नजरेत चर्चा रंगली आहे. शाहरुख हसायला लागतो आणि तिच्यावर गुलाल ओततो आणि म्हणतो, धन्यवाद तू माझा जीव वाचवला.

महत्वाच्या बातम्या-
संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप
भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची क्रेझ कायम, पहिल्या दिवशी बच्चन पांडे ने कमावले तब्बल एवढे कोटी
माझ्यामुळे कुणालाही तकलीफ नको म्हणत तरुणाने केलं विष प्राशन; मन हेलावून टाकणारा LIVE व्हिडिओ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now