सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding) चर्चा जोरात सुरू आहे. या महिन्याच्या पुढच्या आठवड्यात दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात. दरम्यान, कपूर घराण्याचा जावई आणि इंडस्ट्रीतील धाकटा नवाब म्हणवल्या जाणाऱ्या सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या लग्नाची आठवण काढली जात आहे. दोघांचे लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडले होते. त्याचवेळी, सैफ अली खानने एका चॅट शोदरम्यान त्याच्या लग्नाविषयी सांगितले.(When Saif made fun of Kapoor family)
सैफचे म्हणणे ऐकल्यानंतर कोणीही आपलं हासू आवरू शकल नव्हत. खरंतर, लग्नाच्या अनेक वर्षांनी सैफ अली खानने एका चॅट शोमध्ये करीना कपूरसोबतच्या लग्नाविषयी अशी गोष्ट सांगितली जी खूपच मजेदार होती. त्यांनी सांगितले की, ‘त्याची इच्छा होती की, फक्त कुटुंबातील लोकच दोघांच्या लग्नात सहभागी होतील, पण कपूर कुटुंबात 200 लोक असतील तर कमी लोक कसे असतील? ‘. अशा स्थितीत इच्छा असूनही तो कमी लोकांमध्ये लग्न करू शकला नाही. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा विवाह मुंबईतील वांद्रे येथे जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
लग्नात फक्त कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन अप्रतिम होते. दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण बॉलिवूड सहभागी झाले होते. ‘टशन’ चित्रपटादरम्यान दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले आणि नंतर लग्न केले. दोघेही 2 मुलांचे पालक बनले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर आणि लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे.
त्या दोघांच्या लग्नाच्या वेळी सैफ घटस्फोटित होता आणि त्याला दोन मुले होती. अशा परिस्थितीत लग्नाआधी करीना कपूरच्या जवळच्या लोकांनी अभिनेत्रीला सैफ अली खानशी लग्न करू नये म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिनाला सांगण्यात आले की सैफ आधीच घटस्फोटित आहे आणि तो दोन मुलांचा बाप देखील आहे, त्यामुळे त्याच्याशी लग्न केल्याने अभिनेत्रीच्या इमेजवर वाईट परिणाम होऊ शकतो. लग्नामुळे तिचं करिअर बरबाद होऊ शकतं, असंही करीनाला सांगण्यात आलं होतं.
मात्र, एकदा या संपूर्ण घटनेचा संदर्भ देताना करीना कपूर म्हणाली होती, ‘हे सर्व ऐकल्यानंतर मला वाटले की, प्रेम करणे खरोखरच इतके मोठे पाप आहे का? आता लग्न करू आणि बघू काय होतं ते. सैफचे पहिले लग्न 1991 मध्ये त्याच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाले होते. या लग्नापासून सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली. रिपोर्ट्सनुसार, सैफ आणि अमृताचा 2004 मध्ये लग्नाच्या 13 वर्षानंतर आपसी भांडणामुळे घटस्फोट झाला.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार आमिर खानसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे करिना कपुरने सैफ अली खानला दिली कडक सुचना, म्हणाली, आता एकही मुल जन्माला घालायचे नाही
…म्हणून सैफशी ब्रेकअप झाल्यानंतरही अमृताने केले नाही दुसरे लग्न; खरे कारण आले समोर
सैफ आणि अमृताच्या संसारात सारा ठरली मिठाचा खडा? सैफ अली खानने सांगितलं घटस्फोटामागचं कारण
सैफ अली खानच्या वडिलांशी होणार होते या अभिनेत्रीचे लग्न; एका दु:खापासून आजही सावरू शकली नाही स्वत:ला