Share

पुरूषांनी फक्त ‘हे’ काम केलं पाहिजे, जेव्हा रिया चक्रवर्तीने दिला होता रिलेशनशिबद्दल सल्ला

रिया चक्रवर्तीने (Riya Chakraborty) १ जुलै रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला आहे. एका मुलाखतीत तणावमुक्त नातेसंबंधाचे रहस्य सांगताना रियाने सांगितले की पुरुषांनी महिलांचे ऐकले पाहिजे. तसेच, अभिनेत्री गमतीने म्हणाली की, जे पुरुष आपल्या महिला जोडीदाराचे ऐकत नाहीत ते नेहमीच दुःखी असतात.(Riya Chakraborty, Mahesh Bhatt, Women, Stress Free Relationships)

रियाने २०१८ मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, मला वाटते की पुरुषांनी फक्त महिलांचेच ऐकले पाहिजे. आम्ही काय करतो आहोत, आम्ही काय बोलत आहोत हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला तणावमुक्त नातेसंबंध आणि चांगले जीवन हवे असेल तर, स्त्रियांचे ऐका. महेश भट्ट यांनीही रियाच्या या मुद्द्याला होकार दिला आणि सांगितले की तो सुद्धा एक ‘आनंदी माणूस’ आहे, कारण तो अशा घरातून आहे जिथे फक्त महिलाच चालत.

रिया पुढे म्हणाली, “जे महिलांचे ऐकत नाहीत ते नेहमीच दुःखी असतात.” सोनी राजदानचे पती आणि पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांचे वडील महेश भट्ट म्हणाले की, महिला बुद्धिमान असतात आणि योग्य निर्णय घेतात. त्यामुळे महिलांचे ऐकणे आवश्यक आहे.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता तिने २००९ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या टीव्हीएस स्कूटी ‘टीन डीवा’ मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. या शोमध्ये रिया फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने MTV मध्ये VJ होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. यानंतर रिया चक्रवर्ती तिच्या करिअरमध्ये एक-एक पायऱ्या चढत राहिली.

अनेक व्यावसायिक जाहिराती केल्या आणि फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून तिने पदार्पण केले. हा चित्रपट २०१२ साली आला होता. यानंतर रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारुती (२०१३)’, ‘सोनाली केबल (२०१४)’, ‘बँक चोर (२०१७)’ आणि ‘जलेबी (२०१८)’ सारखे चित्रपट केले. शेवटचा चित्रपट रिया चक्रवर्तीचा ‘चेहरे’ होता जो गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात रिया चक्रवर्तीची विशेष भूमिका नव्हती. तसेच लोकांना ड्रग्जने वेढलेली अभिनेत्री पाहायचीही इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. भक्कम स्टारकास्टच्या जोरावर हा चित्रपट चालू शकला असता, पण तसे होऊ शकले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला एकाही चित्रपटाची ऑफर मिळालेली नाही. ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

आजकाल ती सोशल मीडियावर खूप कमी अॅक्टिव्ह दिसत आहे. रिया रिडिंग आणि व्हेकेशनवर जाताच स्पॉट झाली. आजकाल रिया चक्रवर्तीकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. ती काही निवडक डिझायनर्ससोबत फोटोशूट करताना दिसते. याशिवाय तिच्याकडे विशेष असे काही काम नाही. रिया चक्रवर्तीकडे एकही व्यावसायिक जाहिरात नाही.

महत्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणातील आदित्य ठाकरेंच्या भूमिकेबद्दल प्रेयसी रिया चक्रवर्तीने केले होते ‘हे’ खुलासे
कोण आहे शिवानी दांडेकर जी होणार जावेद अख्तरच्या घरची सून? रिया चक्रवर्तीसोबत आहे खास नाते
रियाच्या या ५ विधानांमुळे गेली सुशांत सिंग राजपूतची इज्जत, बॉलिवूडमध्ये उडाली होती खळबळ
सुशांत काल माझ्या स्वप्नात आला, त्याने मला सांगितले की पहा काय म्हणाली होती म्हणतेय रिया

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now