ब्रेकअपनंतर जेव्हा रेखा पार्टीत भेटली, तेव्हा सर्वात आधी अमिताने केलं होतं हे काम. चाहतेही हैराण

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वांनी ऐकल्या असतील. क्वचितच कोणी असेल ज्याला त्यांच्या प्रेमाबद्दल माहित नसेल. अमिताभ, रेखा आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा लव्ह ट्रँगल (Love Triangle) हा नेहमीच बॉलिवूडचा चर्चेचा विषय राहिला आहे.(When Rekha met at the party after the breakup, Amita had done it)

बातमीनुसार, अमिताभ आणि रेखा एकेकाळी खूप सीरियस रिलेशनशिपमध्ये होते. 1984 मध्ये एका मुलाखतीदरम्यान रेखाने या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले होते. अभिनेत्रीने कबूल केले की ती आणि बिग बी रिलेशनशिपमध्ये होते. रेखा आणि अमिताभ नकळत एकत्र आले होते आणि त्यांचा शेवटचा चित्रपट ‘सिलसिला’ होता. त्यानंतर दोघेही वेगळे झाले.

मात्र, त्यानंतर दोघे एका पार्टीत भेटले. ही पार्टी शबाना आझमी यांच्या घरी ठेवण्यात आली होती. स्वतः दिवंगत नेते अमर सिंह यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या घरच्या पार्टीला आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले होते. अमर सिंहदेखील पार्टीला हजर होते.

अमर सिंह यांनी सांगितले की, ते अमिताभ आणि जयासोबत एकाच कारमधून शबाना यांच्या घरी पोहोचले होते. अमिताभ आणि रेखा यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्या दिवशी शबानाच्या पार्टीत अमिताभ यांना रात्री उशिरापर्यंत थांबायचे होते, म्हणून आम्ही ड्रायव्हरला जेवायला पाठवले होते. दरम्यान, अमिताभ पार्टीत पोहोचताच त्यांना समोर रेखा दिसली. यानंतर जणू बिग बींनी तिथून निघून जाण्याचे ठरवले होते.

त्या पार्टीतून बिग बी घरी परतले, सोबत जया आणि अमर सिंह यांनाही परतावे लागले. अमर सिंह सांगतात की, आम्ही ड्रायव्हरला पाठवलं होतं म्हणून आम्ही परत घरी कॅबमध्ये आलो. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री रेखाने कबूल केले की ती आणि अमिताभ बच्चन रिलेशनशिपमध्ये होते.

रेखाने सांगितले की, आपली प्रतिमा, संसार आणि मुले वाचवण्यासाठी अमिताभ यांनी हे नाते सर्वांसमोर स्वीकारले नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही. रेखा पुढे म्हणाली, लोकांना माझ्याबद्दल आणि त्याच्या प्रेमाबद्दल का सर्वच कळायला हवं. दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, ते पुरेसे आहे.

महत्वाच्या बातम्या-
410 किमी उलटं पायी चालत आला होता अमिताभचा हा फॅन, जया बच्चनने बांधली होती त्याला राखी
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ही अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत या चित्रपटात केलं होतं काम
मुलाच्या चित्रपटाला प्रोमोट केलं म्हणून ट्रोल करणाऱ्यांवर अमिताभ भडकले, म्हणाले, क्या कर लोगे?