बाबो! लोकांना दिसला शिंग असलेला साप, व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

हे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. इथे कधी, काय बघायला, ऐकायला मिळेल, काहीच सांगता येत नाही. कधी-कधी आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. असाच एक व्हिडिओ (Snake Video) सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.(when-people-saw-the-horned-snake-it-was-hard-to-believe-their-eyes)

ज्यामध्ये लोकांना शिंगे असलेला साप दिसत आहे. आता तुमच्या मनातही प्रश्न निर्माण होत असेल की शिंगे असलेला साप? तर आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की हो, शिंग असलेला साप आजकाल लोकांमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे. आजपर्यंत तुम्ही शिंगे असलेले प्राणी पाहिले असतील. जसे गाय, म्हैस, बैल पण शिंगे असलेला साप क्वचितच कोणी पाहिला असेल.

पण, हा व्हायरल व्हिडिओ(Viral video) पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक शिंगे असलेला साप दिसणार आहे. तुम्हाला कदाचित या दृश्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. पण, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा भ्रम नक्कीच दुर होईल. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की शिंगे असलेला साप कसा झुडपांकडे सरपटत आहे. सापाच्या डोक्यावर दोन लहान शिंगे असतात. व्हिडिओ पहा…

व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल. एवढेच नाही तर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होईल. मात्र, या प्रकरणाची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण, शिंगवाल्याने गदारोळ माजवला असून लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

ट्विटरवर ‘@mitulg881’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही लोक म्हणतात की असे साप वाळवंटात आढळतात. ह्यांना वाइपर साप म्हणतात, ज्यांच्या डोक्याला दोन शिंगे असतात. कदाचित जेव्हा तुम्ही वाळवंटात जाल तेव्हा तुम्हाला शिंग असलेला साप दिसेल.