प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. आणि प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव, आवडी – निवडी या वेगवेगळ्या असतात. काही व्यक्तींना झोपेत बोलन्याची सवय असते. तुम्हाला वाचून धक्का बसेल मात्र, काही व्यक्ती या झोपेत चालतात. अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे.
हा संपूर्ण प्रकार वाचून तुमच्या देखील पायाखालची जमीन नक्कीच हादरेल. झोपेत स्वप्न आपल्याला देखील अनेकदा पडतात. केव्हा चांगली स्वप्न पडतात. तर केव्हा वाईट स्वप्न पडतात. असं बोलतात की पहाटे पडलेली स्वप्न ही सत्यात उतरतात होतात.
मात्र आता आम्ही तुम्हाला असं एक प्रकरण सांगणार आहोत की, वाचून तुम्हाला धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वप्नामुळे शेतकरी प्रत्यक्षात जखमी झाला. आपल्या पत्नीसाठी बकरा कापत असल्याचं स्वप्न शेतकऱ्याला पडलं. मात्र प्रत्यक्षात त्यानं स्वत:चं गुप्तांग कापलं.
वाचा नेमकं घडलं काय?
हा धक्कादायक प्रकार पश्चिम आफ्रिकेत असलेल्या घाना देशातील एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोफी अट्टा असं शेतकऱ्याचं नाव असून तो ४७ वर्षांचा आहे. आपल्या पत्नीसाठी बकरा कापत असल्याचं स्वप्न शेतकऱ्याला पडलं.
मात्र प्रत्यक्षात त्यानं स्वत:चं गुप्तांग कापलं. त्यामुळे शेतकरी रक्तबंबाळ झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर कोफी उठला त्यावेळी तो रक्तबंबाळ झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नातच त्यानं गुप्तांगासोबत वृषणाची पिशवीदेखील कापली होती.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा पत्नी घरी नव्हती. मात्र घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. घाबरलेल्या पत्नीने रक्तस्राव थांबवण्यासाठी डायपरचा वापर केला. त्यानंतर तिनं आपल्या जखमी पतीला रुग्णालयात दाखल केलं.
घडल्या प्रकाराबद्दल बोलताना कोफीनं सांगितलं की, ‘मी खुर्चीत बसलो. मात्र त्यावेळी अचानक मला झोप लागली. माझ्या समोर बकरा आहे आणि तो मी कापतोय, असं स्वप्न मला पडलं.’ या संपूर्ण प्रकरणात कोफीला जबर दुखापत झाली. हा प्रकार पासून डॉक्टर देखील चांगलेच घाबरले.
महत्वाच्या बातम्या-
Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर
Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये दडला आहे एक चेहरा, फक्त ३०% लोकांना ३० सेकंदात देता आलंय योग्य उत्तर
Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर
Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये दडला आहे एक चेहरा, फक्त ३०% लोकांना ३० सेकंदात देता आलंय योग्य उत्तर