बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood Industry) असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या दमदार अभिनयासाठी तसेच उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. या यादीत अभिनेता जॉनी लीव्हरच्या (Johnny Lever) नावाचाही समावेश आहे. जॉनी लीव्हरने आपल्या प्रत्येक पात्राला जीवदान देण्याचे काम केले आहे. चाहत्यांना चित्रपटातील त्याची कॉमिक टायमिंग आवडते. इतकंच नाही तर त्याची प्रत्येक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.(When Johnny Lever had to do comedy on the day of his sister’s death)
जॉनी लीव्हर यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. चित्रपटांतून लोकांना हसवणाऱ्या जॉनी लीव्हरने आपल्या बहिणीच्या मृत्यूच्या दिवशीही परफॉर्म केला होता आणि याचा त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत खुलासा केला होता. जॉनी लीव्हर यांच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग क्वचितच काही लोकांना माहित असेल.
जॉनी लीव्हरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला तेव्हाही तो सर्वांना त्याच्या घरी रडत सोडून परफॉर्म करायला गेला होता. यादरम्यान त्याने कारमध्ये कपडेही बदलले. आपल्या आयुष्यातील या दुःखद घटनेचा उल्लेख करताना अभिनेता म्हणाला, ‘माझ्या बहिणीचे निधन झाले होते आणि नंतर मला एक शो करायचा होता. त्यावेळी मला वाटले की माझा शो रात्री 8 वाजता आहे. पण नंतर मला कळलं की माझा शो दुपारी 4 वाजता होणार आहे.
अभिनेता पुढे म्हणाला की, त्यावेळी माझा मित्र आला आणि मला म्हणाला की नाही, शो 4 वाजता आहे आणि कॉलेजचे फंक्शन आहे. मग वाटलं, अरे बाप रे, 4 वाजलेत. घरी सगळे रडत होते. मी शांतपणे आत जाऊन माझे कपडे आणले. त्या दिवशी मी टॅक्सीमध्ये माझे कपडे बदलले. माझ्याकडे गाडी नव्हती.
जॉनी लीव्हर या मुलाखतीत म्हणाला, कॉलेजची गर्दी कशी असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिथे सर्वजण आपापल्या मूडमध्ये होते. पण तिथे परफॉर्म करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. त्यावेळी मी कशी कामगिरी केली आणि त्यासाठी धैर्य कसे जमवले, हे फक्त देवालाच माहीत होते. मी जे केले ते सर्व जीवनाचा भाग आहे. आयुष्यात तुम्हाला वाईट प्रसंग आश्चर्यचकित करतात परंतु आपण नेहमी तयार असले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
घरात बहिणीचा मृतदेह पडलेला असताना स्टेजवर परफॉर्म करायला पोहोचले होते जॉनी लिव्हर, म्हणाले, त्या दिवशी..
कधी मजदूरी तर कधी रस्त्यावर पेन विकायचे जॉनी लिवर, एकदा घडलं असं काही की बनले कॉमेडी किंग
एलॉन मस्कने जॉनी डेपची पत्नी एम्बर हर्डसोबत केलं होतं थ्रीसम? नवीन खुलाश्याने कोर्टही हादरलं
सलग पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या अडचणीत वाढ, कर्णधारपद जाणार?