Share

Raj thackeray : ‘शिवनेरीवर गेलो असता अचानक अंधारातून खांद्यावर हात आला अन…’; राज ठाकरेंनी सांगितला खास किस्सा

लवकरच ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने त्यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी एक किस्सा सांगितला, ज्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी १९९४ चा शिवनेरिवरचा एक किस्सा सांगितला आहे. म्हणाले, १९९४ची घटना आहे, मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, आणि २-३दिवसांत शिवजयंती होणार होती त्यामुळे माझ्या डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहीत बसलो होतो.

तेवढ्यात तिथे सामनाचे बाळासाहेब दांगट आले आणि त्यांनी मला सांगितले की, ‘फार वर्षांपूर्वी बाळासाहेब शिवनेरी किल्ल्यावर आले होते, त्यानंतर कोणताच ठाकरे शिवनेरीवर आला नाही, पण आता तुम्ही या.’ पण मी त्यांना नकार दिला असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे राज ठाकरे म्हणाले, मी शिवनेरी जायला नकार तर दिला होता, पण दुसऱ्या दिवशी काय झालं माहिती नाही, मी सगळे माझे कार्यक्रम रद्द केले आणि शिवनेरीवर गेलो. सकाळी गडावर चढलो आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याठिकाणी गेलो.

तिथे एक अंधार खोली आहे. मी तिथे भिंतीवर हळद-कुंकू टाकले आणि भिंतीकडे पाहत बसलो होतो. तेव्हा अचानक एक हात माझ्या खांद्यावर आला आणि आवाज आला की, इथेच महाराजांचा जन्म झाला आहे. आवाज ऐकून मी मागे पाहिले, तर तिथे कोणीच नव्हते.

त्यानंतर मला काहीच सुधरलं नाही असे राज ठाकरे म्हणाले, आणि पुढचा किस्सा सांगितला. म्हणाले, त्यानंतर मी डोक्यावर पाणी टाकून नॉर्मल झालो. त्या दिवशी तिथे कोण होतं, मला काहीच माहित नाही. मी म्हणत नाही की ते महाराज होते. पण कोण होतं माहिती नाही, तसा अनुभव कधी आला नाही, असे ठाकरे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now