राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं अब्बुल सत्तार यांनी म्हटलं आहे. यामुळे रावसाहेब दानवे खरे बोलतात की, सत्तार यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर दानवे काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सत्तार यांनी आघाडी सरकार स्थिर असल्याचे सांगितले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समुद्राप्रमाणे स्थिर आहेत. त्याची बदनामी कोणी करू नये. मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले तर बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त करू. मुख्यमंत्री यांनी आदेश दिले तर शिवसैनिक मैदानात उतरेल,” असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी राणा दाम्पत्यांवरही निशाण साधला आहे. “त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहण्याची लायकी नाही. त्यांची किंमत चार आण्याचीही नाही. त्यांना पळता भूई कमी पडेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.”
मी वयाच्या २०व्या वर्षी नगरसेवक झालो होतो, त्यावेळी बाबरी आंदोलनात सहभागी झालो होतो. असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय. बाबरी पडली तेव्हा तुमचे वय काय होते? काय शाळेची सहल होती काय? तुमच्या वजनाने बाबरी पडली असती. कुणाला तिकडे जाण्याची गरज पडली नसती, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि औरंगाजेबाची कबर हा विषय चांगलाच रंगला आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर जोरदार वार केला आहे. सत्तार यांनी भाजप राणा दाम्पत्य
आणि अकबरूद्दीन ओवेसी यांचा समाचार घेत थेट भाजवर टीका केली आहे.
महत्वांच्या बातम्या:-
मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट
मथुरेतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत मोठी बातमी; ‘विहिरीत सापडले शिवलिंग’
उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….