एखादी व्यक्ती जेव्हा सेलिब्रिटी म्हणुन नावारूपाला येते तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी या चर्चेत येतात.बऱ्याचदा अनेक सेलिब्रिटींना या चर्चेचा फायदा कमी पण नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागते. हॉलिवूडच्या एका सेलिब्रिटीला अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
आपल्या स्टाईलिश व बोल्ड अंदाजासाठी किम कर्दाशियां ही हॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत राहणारी स्टार आहे. किमला तिच्या रिऑलिटी टीव्ही शोजसोबतच वादग्रस्त सेक्स टेपसाठीही ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच किमचा नवा शो “द कर्दाशियां ” लॉन्च झाला आहे. हा शो किम आणि तिच्या परिवाराबाबत आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये किमचा ६ वर्षांचा मुलगा सेंट वेस्टला त्याच्या आयपॅडवर रोब्लॉक्स खेळताना बघण्यात आलं. या खेळादरम्यान सेंटने किमचा फेमस रडतानाचं मीम पाहिलं. या मीममध्ये किमच्या सेक्स टेपमधील काही सीन्स दिले गेले होते.याबाबत खुद्द किमनेच खुलासा करत धक्का दिला आहे.
याबाबत सांगताना किम म्हणाली की, “ते क्लिकबीट होतं ज्यावर देण्यात आलं होतं की, जर तुम्ही यावर क्लिक कराल तर एक नवीन सेक्स टेप येईल. जर माझा मुलगा थोडा आणखी मोठा असता आणि त्याला वाचता आलं असतं तर मी पुरती संपलेच होती.पण तेव्हाही मी आतल्या आत प्राण गमावलेच होते”.
सेक्स टेपचा नेमका वाद काय आहे?
२००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स प्रियकर आर. जे. सोबत दिसली होती. याच सेक्स टेपने किमला जगभरात फेमस केलं. परंतु यासाठी तिला खूपकाही ऐकावं सुद्धा लागलं.
२००७ मध्ये बनविण्यात आलेला हा वादग्रस्त व्हिडीओ होता. हा व्हिडीओ एका जाहिरातीचा होता. या वादग्रस्त व्हिडीओचे प्रदर्शन रोखण्यासाठी किमने खुप प्रयत्न केले होते. यासाठी तिने अडल्ट प्रोडक्शन कंपनी विवेडला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. किमचा आरोप होता की, या कंपनीने तिची सेक्स टेप इंटरनेटवर टाकली.यानंतर कंपनीने किमसोबत हा वाद मिटवला होता.
काही दिवसांपूर्वी केविन ब्लट्ट नावाच्या सेक्स टेप ब्रोकरने दावा केला होता की, किम कर्दाशियांने या तिच्या सेक्स टेपमधून २० मिलियन डॉलर्स म्हणजे १५२ कोटी रूपये कमाई केली होती. त्याने असंही सांगितलं होतं की, आर. जे सोबतच्या व्हिडीओच्या फायनल कटमधून काही सर्वात बोल्ड सीन्स हटविण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका! कडक शब्दांत झापत गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली
…तर राणा दाम्पत्याला तीन वर्षे जेलची हवा खावी लागणार? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम
राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका! कडक शब्दांत झापत गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली
तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा मालक आहे केएल राहुल, पाच अभिनेत्रींवर आहे फिदा, आई-वडिल आहेत प्रोफेसर