wheather forcast department information about mansoon | राज्यातील विविध भागात पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा धक्का बसला आहे. हा पाऊस कधी थांबणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस जाण्यासाठी अनुकूल असलेले वातावरण तयार झाले आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. २२ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ही दिलासादायक बातमी असणार आहे.
बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मान्सून पश्चिम वायव्य दिशेकडे वेगाने सरकत आहे. २२ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये आणि २३ ऑक्टोबरला कमी दाबाचे क्षेत्र डीप डिप्रेशनमध्ये जाणार आहे.
तसेच २४ तारखेला सीतरंग चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबरला ओडिशा किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मान्सून लवकरच जाणार आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पण परतीचा पाऊस लांबण्याची काही कारणे सुद्धा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते. तसेच आजूबाजूला वाहणारी वारे शहरी भागाकडे वाहत असतात, त्यामुळे यंदा परतीचा पाऊस लांबला होता.
राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यावेळी राज्यात १२३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांमध्ये बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात वादळे निर्माण व्हायची. पण आता अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे यंदा जास्त पाऊस पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : भाजपच्या माजी मंत्र्यांनी शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले आता तुम्ही फक्त…
Uddhav Thackeray : आदित्यनी सांगीतलं शिंदेंच्या बंडावेळी कशी होती उद्धवजींची अवस्था; ‘त्यांचे हातपाय थरथरत होते अन्…
Shivsena : अंधेरीत पुन्हा नाट्य! ‘शिवसेना नेते मला धमकी देत आहेत’; उमेदवाराचे गंभीर आरोप, आयोग काय ॲक्शन घेणार?