सोशल मीडियावर सध्या ‘थेरगाव क्विन ‘ आणि स्वयंमघोषित ‘लेडी डॉन’ म्हणून मिरवणाऱ्या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्धी मिळावी यासाठी तिने तिच्या साथीदारांसोबत नको ते उद्योग केले होते. एवढंच नाहीतर 302 अर्थात खून करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे,तिच्यासह तिच्या साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र,अजूनही तिच्या अकाउंटवरून दोन पोस्ट व्हायरल झाल्यामुळे पोस्ट कोठून व्हायरल होतयं असा सर्वांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.
संबंधित युवतीचे नाव साक्षी महाले असून, तिचे इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’ नावाचे प्रोफाईल आहे. या प्रोफाईलवर साक्षी रील्स शेअर करायची. या रील्समध्ये ती अश्लील भाषेत शिव्या द्यायची. साक्षीचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक रील्स व्हायरलही झाले होते. त्यामुळे,सोशल मीडियावर या तरुणीविरोधात कारवाई कशी होत नाही असा सवालही काही नेटकर्यांनी विचारला होता.
पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदारांचे वय लक्षात घेऊन त्यांना समज बजावला होता. मात्र, तरीही तिने आणि तिच्या साथीदारांनी दुर्लक्ष केले .पुन्हा तेच तेच व्हिडिओ सोशल मीडियावर येऊ लागल्याने अखेर वाकड पोलिसांनी साक्षी महाले आणि तिचे साथीदार कुणाल कांबळे आणि साक्षी कश्यप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि थेरगाव क्विन ला अटक केली.
मात्र थेरगाव क्वीनला अटक करूनही कालपासून अजून दोन पोस्ट ‘थेरगाव क्विन’ या अकाउंट वरून व्हायरल झाल्या आहेत. थेरगाव क्विन पोलिसांच्या ताब्यात असुनही या पोस्ट कुठून व्हायरल होत आहेत याचा प्रश्न सर्वसामान्यांसोबत पोलिसांना देखील पडला आहे.
दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना केवळ लाईक्स मिळवेल ,फॉलोअर्स वाढावेत म्ह्णून कुणीही असे बेकायदेशीर कृत्य करत असल्यास त्यांच्या विरुद्धही बेकायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावेळी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये फोनवर भाई म्हटला नाही म्हणून एका गुंडाने आपल्या साथीदारांसह एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर,जमिनीवर बिस्किट टाकून कुत्र्यासारखी त्या तरुणाला ती खायला लावली. या संबंध प्रकाराचा व्हिडिओ आरोपींनी बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाच जणांना बेड्या ठोकल्या.






