ब्रिटन(Britain): इतिहासात ब्रिटनच्या गादीवर सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचं ८ सप्टेंबरला गुरुवारी निधन झालं. त्यांचे वय ९६ वर्ष होते. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी जगातून निरोप घेतला. स्कॉटलंडमधील बालमोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर आता त्यांच्या कोहिनूर मुकुटावर कोणाचा अधिकार असेल, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भारतातील जगप्रसिद्ध असलेला कोहिनूर हिरा गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनकडे आहे. तो हिरा परत आणण्यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले. हा हिरा आम्ही परत भारतात आणूच, असे आश्वासनही अनेक राजकारण्यांनी दिले. पण ते कोणालाच जमलं नाही त्यामुळे आता ती मागणीही बंद झाली आहे. पण भारताचा हाच कोहिनूर हिरा सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
कारण, ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटात सध्या हा कोहिनूर हिरा आहे. हाच मुकुट येत्या काही काळात प्रिन्स चार्ल्सची दुसरी पत्नी कॅमिलाला मिळण्याची शक्यता आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या राज्यारोहणाच्या 70 व्या वर्धापनदिनी ते जाहीर केले होते. परंतु, राणी कॅमिलाला अमूल्य कोहिनूर हिऱ्याचा मुकुट मिळेल का?, हा मोठा प्रश्न आहे.
राणी एलिझाबेथ यांच्या या जाहीरनाम्यानंतर आता ब्रिटनच्या राजघराण्याच्या भवितव्याला नवा आकार मिळेल, असंही बोललं जात आहे. राणीच्या या मुकुटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोहिनूर हिरा आहे. १०५ कॅरेटचा (२१.६ ग्रॅम) हा हिरा अतिशय मौल्यवान आहे. एकेकाळी हा जगातला सर्वात मोठा ज्ञात हिरा समजला जात होता. हा हिरा भारतातील अनेक मुघल व फारसी राज्यकर्त्यांकडून शेवटी ब्रिटिशांकडे गेला आणि त्यांच्या शाही खजिन्यात सामील झाला.
ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन डिजराएली यांनी महाराणी व्हिक्टोरिया यांना १८७७ मध्ये भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलं. त्यानंतर ‘काेहिनूर’ हिरा ब्रिटिश राजघराण्याचा हिस्सा झाला. भारतासह किमान चार देशांमध्ये या हिऱ्याच्या ऐतिहासिक मालकीवरून वाद अजूनही सुरूच आहे. दरम्यान, हा हिरा राणी एलिझाबेथ यांच्यासाठी बनवलेल्या प्लॅटिनम क्राउनमध्ये लावण्यात आला होता.
प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाह २००५ मध्ये झाला होता. या लग्नाची संवेदनशीलता ओळखून राजघराण्याकडून घोषणा करण्यात आली होती, की चार्ल्स राजा झाल्यानंतर कॅमिला यांना ‘क्वीन कन्सोर्ट’ म्हणून ओळखलं जाईल. आता तो कोहिनूर मुकुट कॅमिला यांना दिला जाईल की नाही? या मुकुटाचं पुढे काय होईल?, हे येत्या काळात राजघराण्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरून स्पष्ट होईल.
क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूमुळे आता ब्रिटनमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ब्रिटनला राष्ट्रगीत, पासपोर्ट, पोलीस गणवेश तसंच चलनही अपडेट करावं लागणार आहे. कोहिनूर हिरा जगप्रसिद्ध आहे. परंतु, त्याच्या बाबतीतलं रहस्य अजूनही उकललेलं नाही. भारत जसा या हिऱ्यावर आपला दावा सांगतो, तसंच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचंही म्हणणं आहे, कोहिनूर इतर कोणाचा नसून तो फक्त आमचाच आहे.
अर्थातच याचं कारण हा हिरा भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, ब्रिटन असे अनेक देश फिरुन आला आहे आणि अनेक राज्यकर्त्यांच्या खजिन्याचा तो ताज ठरलेला आहे. इतकी वर्षे झाली, पण त्याबाबतचा वाद अजूनही सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या
Bundelkhand: दुकानदाराने समोसा सोबत प्लेट, चमचा दिला नाही म्हणून पठ्याने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाला..
राणी एलिझाबेथने आपल्या मागे सोडली तब्बल ‘एवढी’ संपत्ती, हा खजिना आता कोणाला मिळणार?
माझी सुंदरता पाहून पोलिसांनी मला अटक केली अन् केला बलात्काराचा प्रयत्न, महिलेचा गंभीर आरोप
…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा