Share

बप्पी लहिरींच्या निधनानंतर त्यांच्या दागिन्यांचं काय होणार? मुलानं केला मोठा खुलासा

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दुःखातून देश बाहेर पडत नाही तोवरच गायक, संगीतकार बप्पी लहिरी यांचं निधन झालं. संगीत सृष्टीतील दोन हिऱ्यांना गमवावं लागलं यामुळे जगभरात शोककळा पसरली. यातच आता बप्पी लहिरी गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यांबद्दल चर्चा होत आहे. त्यांच्या मुलानं याबाबत नवीन खुलासा केला आहे.

बप्पी लहिरी हे गोल्ड मॅन म्हणून देखील ओळखले जात होते. ते नेहमी त्यांच्या अंगावर अफाट सोन्याचे दागिने घालत होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या या दागिन्यांचे पुढे काय याबद्दल चर्चा होत होती. अशातच त्यांच्या मुलानं या बद्दल उत्तर देऊन चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

बप्पी लहिरी यांच्या मुलाचं नाव बप्पा लहिरी असून, त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, माझ्या बाबांना सोन्याची किती आवड होती हे सर्वांनाच माहिती आहे. ते सोन्याशिवाय कुठे प्रवाससुध्दा करत नव्हते. अगदी पहाटे 5 वाजता जरी त्यांची फ्लाईट असेल तरी ते सोनं घालूनच बाहेर पडायचे.

त्यांच्या निधनाने त्यांच्या दागिन्यांचे काय होणार याची सर्वत्र चर्चा होती, याबद्दल मी तुम्हांला सांगू इच्छितो की, त्यांचे सर्व दागिने आम्ही एका म्युजियममध्ये ठेवणार आहोत. जेणेकरून त्यांच्या आठवणी त्यांच्या चाहत्यांना स्वतः पाहता येतील, अनुभवता येतील. असे सांगून मुलानं चर्चेला पूर्ण विराम दिला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बप्पी दा यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. ओएसए मुळे त्यांचा मृत्यू झाला. ओएसए हा झोपेच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात वारंवार व्यत्यय येतो. यामुळे वजन तर वाढतेच पण रक्तातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते.

बप्पी लहिरींचं वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी निधन झालं. बप्पी लहिरी यांनी 80 आणि 90 च्या दशकात खूप दबदबा निर्माण केला होता. ते एकमेव गायक आणि संगीतकार होते ज्यांनी भारतीय चित्रपटाला डिस्को संगीताची ओळख करून दिली आणि ते लोकप्रिय केलं. बप्पी दा यांनी ‘वारदात’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’ आणि ‘कमांडो’ यांसारख्या अनेक हिट सिनेमांना संगीत दिले.

इतर

Join WhatsApp

Join Now