आता टॅटूचं काय करायचं? सामंथाच्या अंगावर आहेत तीन टॅटू, एकाचं कनेक्शन आहे थेट नागा चैतन्यशी

अभिनय क्षेत्रातील सध्या सर्वांची आवडती, प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आहे. समंथाने अनेक हिट चित्रपट तसेच अनेक वेबसिरिज केल्या आहेत. समंथाने अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीही केल्या आहेत. अशातच पुष्पा या चित्रपटातील ‘ऊं अंटावा’ या गाण्याने तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे.(What to do with tattoos now? Samantha has three tattoos on her body)

समंथा आता अशा टप्प्यावर उभी आहे. जिथून ती मागे वळून पाहणारच नाही. परंतु जेव्हा समंथा तिच्या कारकिर्दीतील उंची गाठत होती. त्यावेळी समंथाच्या खासगी आयुष्यात मात्र मोठे वादळ आले होते. अभिनेता नागा चैतन्य याच्याशी असणारे आपले वैवाहिक नाते तुटल्यामुळे समंथा सध्या त्यातून सावरत आहे.

समंथा यातून सावरत असली, तरी तिला अनेक गोष्टी तिच्या जुन्या आठवणींच्या गावात नेत असाव्यात. समंथाला नागा चैतन्यशी जोडून ठेवणारी एक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरचे टॅटू. समंथाच्या अंगावरचे तीन टॅटू फार अर्थपूर्ण आहेत.

समंथाच्या मानेवर एक टॅटू आहे, समंथाच्या मनगटावर एक ट्याटू आहे आणि तिसरा टॅटू तिच्या कमरेवर आहे. समंथाच्या मानेवर जो टॅटू आहे, त्याच नातं नागा चैतन्य आणि समंथाच्या पहिल्या चित्रपटाशी आहे.

PHOTOS: Samantha Akkineni's amazing tattoos and their meaning DECODED

त्यानंतर समंथाच्या मनगटावर एक टॅटू आहे. त्या टॅटूमध्ये दोन बाण आहेत. या टॅटूचा अर्थ स्वतःची ओळख स्वतः असा होतो. त्यानंतर समंथाच्या कमरेवर एक टॅटू आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचं टोपणनाव, ‘चै’ कोरलं गेलं आहे.

समंथा आणि नागा चैतन्य यांची लवस्टोरी हेवा वाटण्याजोगी होती. पण एकदमच त्यांच्या नात्याचे समीकरण बदलले आणि 2 ऑक्टोबर 2021 ला त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. समंथा आता स्वतःचे आयुष्य मोकळेपणाने जगत आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..
“बंडातात्यांच्या वक्तव्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच कुणीतरी”; कोण आहे तो?