Share

shivsena : धनुष्यबाण हातातून निसटला तर काय करणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला प्लॅन बी, म्हणाले…

uddhav thackeray

shivsena :सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या याचिकेवर अजून निकाल आलेला नाही. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने निवडणूक आयोगाला त्यांचा निर्णय घेण्यास हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यानंतर पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे? याबाबत शिवसेनेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत जी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गोटात मोठी खळबळ माजली. मात्र या प्रकरणाचा निर्णय प्रक्रियेच्या दरम्यान निवडणुक आयोगाकडून जो कोणता निर्णय येईल. त्यासाठी पूर्णपणे शिवसेना तयारीला लागल्याचे दिसते आहे.

निवडणूक आयोगाने निर्णय प्रक्रियेदरम्यान पक्षाचे चिन्ह गोठवले. अथवा निर्णयाअंती धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे गेला. तरी देखील उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा प्लॅन बी तयार ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान दुसरे नाव तसेच ‘शिवसेना’ या नावाचा वापर न करता निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेत सुरू असल्याचे समजते. निवडणूक आयोग निर्णय घेण्यासाठी जी प्रक्रिया राबवेल. त्यादरम्यान उद्धव ठाकरे गट येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागला आहे.

पहिलीच निवडणूक आहे, असं समजून लढण्याची तयारी शिवसेनेकडून दाखवली जाईल. नव्या चिन्हासह निवडणूक लढवण्याची तयारी, त्यासाठी सोशल मीडियाची टीम, तसेच या चिन्हाचा प्रसार करण्यासाठी रणनीती अशी सर्व तयारी शिवसेनेकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

येत्या काळात निवडणूक आयोग काय निर्णय प्रक्रिया राबवते? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होते? सर्वोच्च न्यायालय अपात्रतेच्या याचिकेबाबत कोणता निर्णय देते? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील. मात्र आता तरी धनुष्यबाण c कोणाला मिळणार, या चर्चेने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
PHOTO: ‘या’ पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये शोधून दाखवा पेन्सिल, फक्त १% जीनिअसच देऊ शकतात योग्य उत्तर
जखमी मुलाच्या वेदना पाहून महिला IAS ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक
KL Rahul: सुर्याचा नाद नाय! लाईव्ह मॅचमध्ये केएल राहुलसाठी सुर्याने केले ‘असे’ काम, चाहत्यांकडून होतंय कौतुक

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now