नुकताच पाच राज्यांच्या विधासभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेचे वेध लागले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ करून आम आदमी पक्षाने विजय मिळवला. नुकतीच पंजाबमध्ये भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता पुढे लवकरच पहिली कॅबिनेट बैठक देखील होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आप नं पंजाब मध्ये स्पष्ट बहुमत आणलं. आम आदमी पक्षातर्फे भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता पुढे 19 मार्चला मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होईल.
तसेच याच म्हणजे 19 मार्चला 117 आमदारांना शपथ दिली जाईल. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच आपल्या भविष्यातील कामाबद्दल घोषणा दिल्या. त्यांच्या या घोषणा आणि कामाचे स्वरूप पाहून महाराष्ट्र सरकारला देखील जे जमले नाही ते पंजाब मध्ये आप करणार आहे असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, आम्ही पंजाबमधील बेरोजगारीपासून शेती, उद्योग, शाळा, हॉस्पिटल या सगळ्यात सुधारणा आणू. भ्रष्टाचाराला आळा घालू. हे काम आव्हानात्मक असले तरी आम्ही ते करून दाखवू असे म्हणाले.
तसेच, दिल्लीत परदेशातून लोकं शाळा आणि मोहल्ला क्लिनिक पाहण्यासाठी येतात, त्याचप्रमाणे यापुढे देखील पंजाबमध्ये येतील. आम्ही आतापासून यावर कामाला सुरुवात करू असं सांगितलं. या कामांना देखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी 19 मार्चला मंत्र्यांच्या शपथविधी नंतर लगेच पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला आद्यप जमलं नाही ते ‘आप’ सरकार पंजाबमध्ये पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूकीत ‘आप’ नं दिलेली आश्वासने यावर लवकरच काम होणार आहे. त्यासाठी पहिल्या कॅबिनेट बैठकीतच दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जातील असे बोलले जात आहे.