Share

त्यांची लायकी काय, त्यांची सगळी लफडी मला माहितीयेत; खैरेंनी मनसे नेत्याचा सातबाराच काढला

नुकतीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ही मुलाखत म्हणजे काळू -बाळूचा तमाशा असल्याची टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली होती. यावर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, प्रकाश महाजन यांची अवकात काय?त्यांची लफडी मला माहिती आहेत, यापुढे त्यांनी असं बोलू नाही असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी प्रकाश महाजन यांना दिला. तसेच म्हणाले, प्रकाश महाजन यांचे विधान म्हणजे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, प्रकाश महाजन पूर्वी शिवसेनेत होते. या पक्षातून त्या पक्षात जाण्याची त्यांची सवय आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ असून, त्यांच्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करू नाही, प्रकाश महाजन यांना आम्ही सरळ करू, असे खैरे म्हणाले.

महाजन यांची संपूर्ण परिस्थिती काय आहे, मला माहिती आहे. या माणसाच्या भावाने प्रमोद महाजन यांची हत्या केली. यांचे कुटुंबचं असे आहे. आपल्या मोठ्या भावाला भाऊ मारून टाकतो. यांची काय अवकात आहे. प्रकाश महाजनचे सगळे लफडे, प्रकरण मला माहित आहेत. त्यामुळे त्यांनी यापुढे असे बोलू नाही असे खैरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत प्रकाश महाजन म्हणाले होते की, ठाकरे यांची मुलाखत बघण्याची माझी फारशी इच्छा झाली नाही. मात्र मी थोडक्यात बघितली. मुलाखत बघून मला महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी काळू-बाळू नावाचा एक प्रसिद्ध तमाशा होता. या तमाशाचीच आठवण झाली.

इकडून जय महाराष्ट्र म्हटलं की तिकडून जय महाराष्ट्र म्हणायचं. मात्र हे म्हणताना मांजर तरी ‘म्याव’ जोरात म्हणते असं माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून निघत होतं. मात्र, आता ठाकरे का मुलाखत का देत आहेत हे कळत नाही. बापदाद्यांची कमावलेली इस्टेट त्यांनी गमावली अन् आता पडक्या वाड्यात बसून मुलाखत देत आहेत, असा टोला महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर लगावला होता.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now