रितेशकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जेनेलियाने शेअर केला ‘हा’ फोटो, चाहते भावूक

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.

याद्वारे ते अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतात. यामध्ये कधी ते दोघे मजा मस्ती करताना दिसून येतात तर कधी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना. त्यांच्या या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचीही फार पसंती मिळत असते. तर  नुकतंच जिनिलियाने रितेश देशमुखने दिलेल्या खास भेटवस्तूचा खुलासा केला आहे.

तुम्हाला कल्पना असेलच अलीकडेच जेनेलियाने इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशनद्वारे चाहत्यांसोबत संवाद साधला. यामध्ये तिने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा देखील झाला. यावेळी एका चाहत्याने तिला रितेशकडून तुला मिळालेली सर्वात आवडती भेटवस्तू कोणती? असा सवाल केला.

या प्रश्नावर जेनेलियाने रितेशने दिलेल्या गुलाबाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तुम्हाला रितेश सरांकडून मिळालेली खास भेटवस्तू कोणती? असा देखील सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना तिने दोन्ही मुलं रियान आणि राहिल याचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, रितेश आणि जेनेलिया २००३ साली आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दोघे जेव्हा हैदराबाद विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु, दोघांनीही याबाबत माध्यमांना माहिती लागू दिली नाही.

असेही बोलले जाते की, पहिल्याच चित्रपटानंतर जेनेलिया आणि रितेश साखरपुडा करणार होते. मात्र, रितेशचे वडिल विलासराव देशमुख यासाठी तयार नव्हते. जेनेलियाने रितेशला चांगला मित्र असल्याचे सांगत दोघांच्या अफेअरच्या बातम्यांना नकार दिले होते. २०१२ साली दोघे ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हे चित्रपट करत होते. त्यादरम्यान दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांनी लग्न केले.

महत्त्वाच्या बातम्या
रणबीर कपूरच्या शेवटच्या 5 पैकी 3 चित्रपट झालेत प्रचंड फ्लॉप; ‘ब्रह्मास्त्र’ तरी हिट होईल का?
‘पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष स्थापन केला तर…,’ इम्तियाज जलील यांच्या व्यक्तव्याने खळबळ
जुबिन नौटियाल ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत उत्तजुबिन नौटियाल ‘या’ अभिनेत्रीच्या पडलाय प्रेमात, उत्तराखंडच्या सुंदर निसर्गात घेणार सात फेरेराखंडच्या निसर्गात घेणार सात फेरे
“पवारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असेल, तर पवारांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”