सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी हात धुवून लागली आहे. या सर्व नेत्यांवर ईडी PMLA म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदाच्या अंतर्गत कारवाई करताना दिसत आहे. या कायद्यामुळे सध्या ठाकरे सरकारचे दोन मंत्री तुरुंगवास भोगताना दिसत आहेत. यासर्व कारवायांमुळे PMLA कायदा चर्चेत आला आहे.
आज आपण याच कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. पीएमएलए कायदा फौजदारी गुन्हासंबंधीत कायदा असून यात 28 कायद्यांच्या 156 कलमांनुसार कारवाई करण्यात येते. या कायद्यातंर्गत संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रूपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे अशा कारवाया करण्यात येतात.
अंमलबजावणी संचालनालय पीएमएलए या कायद्यातील कलमांनुसार काम करत असते. गेल्या काही वर्षात या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. या कायद्याशी ईडीचा जवळील संबंध आहे. ईडीची स्थापना 1 मे 1956 रोजी आर्थिक गुन्हांवर आळा घालण्यासाठी करण्यात आली. ईडीची सर्व सुत्रे अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत हलवण्यात येतात.
इतकेच नव्हे तर, सीबीआय, आयकर विभाग, पोलीस अशा कोणत्याही यंत्रणांनी आर्थिक गैरव्यवहार संबंधी कोणावर गुन्हा दाखल केला तर ईडी तात्काळ अशा प्रकरणांची चौकशी सुरू करू शकते. ईडी संबंधीत व्यक्तीची सर्व प्रकरणाबाबत पूर्ण चौकशी करु शकते. तसेच ईडीला बेनामी मालमत्ता आणि इनकम सोर्स स्पष्ट नसल्यास त्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असतो.
केंद्र सरकारच्या प्राधिकरणाला PMLA अंतर्गत अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी अधिकार क्षेत्र आणि कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. PMLA हा कायदा आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित असल्यानमुळे मनी लाँडरिंग रोखणे आणि त्याविरोधात कारवाई करणे ही कामे या कायद्यातंर्गत करण्यात येतात.
या कायद्याबाबतची माहिती देताना वकील इंदरपाल सिंह यांनी सांगितले आहे की, दोन नंबरचा पैसा किंवा ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो तो पैसा साठवला तर PMLA अंतर्गत कारवाई होत नाही. पण ब्लॅक मनी वापरून एखादा मालमत्ता उभी केली किंवा बेनामी संपत्ती असल्यास PMLA कायद्याअंतर्गत कारवाई होते.
या कायद्यातंर्गत दोषी व्यक्तीला तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते. तसेच जर संबंधित व्यक्ती दुसऱ्या कायद्यातंर्गत दोषी असेल तर त्याला 10 वर्षांसाठीची शिक्षा सुनावण्यात येते. यावेळी संबंधित व्यक्तीची संपत्ती, पैसा ईडी आपल्या ताब्यात घेते.
आतापर्यंत महाराष्ट्रात 10 पेक्षा अधिक नेत्यांवर PMLA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विजय माल्या, नीरव मोदी, रॉबर्ट वॉड्रा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या
“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी
ऍपल वॉचच्या मदतीने करत होता गर्लफ्रेंडचा पाठलाग, बॉयफ्रेंडची युक्ती पाहून पोलिसही चक्रावले
प्रसूतीनंतरही महिलेच्या पोटात होत होत्या प्रचंड वेदना, शस्त्रक्रियेनंतर सगळ्यांना बसला जबर धक्का
…तर रशिया आण्विक हल्ला करणार; प्रमुख नेत्याने दिलेल्या जाहीर धमकीने जगात घबराट