Share

”काय ते शहाजी बापू पाटील, काय त्यांच्या तोंडातील मावा, शेजारी बसलं की समदं वास..”

shahaji bapu patil

सोलापुरातील मोठं नाव असणाऱ्या शरद कोळी या धाडस संघटनेच्या संस्थापकाने नुकतीच हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीवर दाखल होत शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभ्या ठाकलेल्या कोळींनी आता थेट शिंदे गटात गेलेल्या शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (What is that Shahaji Bapu Patil)

काय ते शहाजी बापू पाटील, काय त्यांच्या तोंडात मावा, शेजारी बसलं की समदं वास.. या शब्दात शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील यांची खिल्ली उडवली आहे. सोलापुराच्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शहाजी बापू पाटील हे आता शिंदे गटात सामील झाले आहे.

त्याच शहाजीबापू पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे समर्थक असणाऱ्या शरद कोळी यांनी बापूंच्याच डायलॉग स्टाईलमध्ये त्यांना मावा खाऊन वास येत असल्याचं म्हणत टोला लगावला आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी चार मतदारसंघात एकट्या शिवसेनेचे आमदार होते. आता मात्र फक्त सांगोला मतदारसंघात शहाजी बापू पाटील यांचा रूपाने एकमेव आमदार राहिला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद आणि संघटन वाढवण्याचा दृष्टीने उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न होत आहेत.

रविवारी धाडस संघटनेचे संस्थापक असलेल्या शरद कोळी या हजारो कार्यकर्त्यांची फौज असणाऱ्या नेतृत्वाला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत पक्षप्रवेश दिला. शरद कोळी यांनी धाडस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क सोलापुरात उभा केला आहे.

५ हजारांहून अधिक शाखा आपल्या संघटनेच्या असल्याचा दावा शरद कोळी करतात. शिवसेनेत प्रवेश केल्यावर प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोलापुरात शिवसेना पक्ष मजबूत करेल, असे म्हणत कामाला लागण्याचा आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.


महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : सर्व मलाईदार खाती भाजपकडे तर जुनी खाती शिंदे गटाला, बंडखोरी करून कमावलं की गमावलं?
शिंदेगटात नाराजीचा स्फोट! मंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल २२ आमदार गैरहजर
धोका देणार्‍यांचे राज्य आहे, जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार; मंत्रीपद नाकारल्यावर बच्चू कडू भडकले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now