Share

‘माझी ताकद काय, मला माहिती आहे’; पाकिस्तानला हरवल्यानंतर हार्दिक पांड्याने सांगितली रणनीती

आशिया चषक २०२२ च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू हार्दिक पांड्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळाडूने आपल्या धारदार चेंडूंसोबतच आपल्या वेगवान फलंदाजीने पाकिस्तानी संघाला धूळ चारली.

गोलंदाजी करताना हार्दिकने विरोधी संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली, तर पाकिस्तानच्या फलंदाजीलाही त्याच्या समोर हार मानावी लागली. त्यानंतर हार्दिक पांड्या याला त्याच्या या स्फोटक कामगिरीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी दाखवत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. हार्दिकने केवळ भारतासाठी सामना जिंकला नाही, तर ज्या चाहत्यांना गेल्या ३०८ दिवसांपासून जो क्षण पाहायचा होता तो त्याच्यामुळे पूर्ण झाला. संघासाठी गोलंदाजी करताना हार्दिकने तीन विकेट घेण्याबरोबरच फलंदाजी देखील चांगली केली.

त्यामुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यानंतर त्याने आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, गोलंदाजी करताना, परिस्थितीचे आकलन करणे आणि आपली शैली वापरणे महत्वाचे आहे. माझ्यासाठी शॉर्ट आणि हार्ड लेंथ गोलंदाजी ही माझी ताकद आहे असे तो म्हणाला.

तसेच म्हणाला, जे लक्ष आहे, ते पाहून योजना बनवल्या जातात. मला पहिल्यापासून माहिती होते की, एक तरुण गोलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म स्पिनर देखील आहे. मला माहित आहे की २० व्या ओवरमध्ये गोलंदाज माझ्यापेक्षा जास्त दबावाखाली आहे. मी गोष्टींना सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

यादरम्यान त्याने ४ ओवरमध्ये ६.२५च्या इकॉनॉमीसह २५ धावा दिल्या. याशिवाय त्याने संघासाठी १९० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १७ चेंडूत ३३ धावांची विजयी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटने चार चौकार आणि एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. त्याला रवींद्र जडेजासोबत चांगली भागीदारीही मिळाली.

खेळ

Join WhatsApp

Join Now