सध्या आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिने नुकतेच नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, तिचे आणि नुपूरचे किस करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुपूर आणि आयरा या दोघांनीही आयुष्याचा प्रवास एकत्र घालवण्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं आहे. आयराने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अंगठी घालण्यापूर्वी ती नुपूरला किस करताना दिसत आहे. तिचे आणि नुपूर शिखरेचे किस करतानाचे फोटो पाहून नेटकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
नुपूर शिखरे नेमका कोण आहे आणि काय करतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने Fitnessism ची सुरुवात केली. एवढंच नाही तर तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही ओळखला जातो. तो याआधी आयरालाही प्रशिक्षण देत होता.
विशेष म्हणजे नुपूरने आयराचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यालाही ट्रेनिंग दिली आहे. आमिर खान आणि आयरा खान व्यतिरिक्त नुपूरने सुष्मिताला जवळपास दशकभर प्रशिक्षण दिलं आहे. फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर डान्सरदेखील आहे.
माहितीनुसार, ट्रेनिंग दरम्यानच नुपूर आणि आयरा यांच्यात जवळीक वाढली. दोघांनी डेट करायला सुरुवात केली.अधिकृतरित्या २०२१ मध्ये ती नुपूरसोबत नात्यात असल्याचं सांगितलं होतं. आयराने अनेकवेळा नुपूरला तिचा ड्रीम बॉय म्हणूनही सांगितले आहे.
नुपूर आणि आयरा एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. २०२० मध्ये आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघेही एकत्र उपस्थित होते असं म्हटलं जातं. ही पार्टी गिर राष्ट्रीय उद्यानात देण्यात आली होती. यावेळी मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच आमिर तिथे घेऊन गेला होता.