Share

प्रेमासाठी कायपण! 7 लाख कॅश, 7 तोळ सोनं, 5 मोबाईल, पाकिस्तानातून काय घेऊन आली सीमा हैदर, वाचून डोळे होतील पांढरे…

सध्या पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदरची सगळीकडे चर्चा आहे. असे असताना पाकिस्तानी नवऱ्याला सोडून भारतीय प्रियकराकडे आलेल्या सीमा हैदरवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

याबाबत आपण फक्त प्रेमासाठी पाकिस्तानसोडून भारतात आलो, असे सीमा हैदरने म्हटले आहे. सीमा हैदर देशाचा उंबरठा ओलांडून खरच प्रेमासाठी आली की, अजून काही? असा संशय निर्माण होत आहे.

तिच्या पाकिस्तान मधील सासऱ्याने एक धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले, तिने 7 लाख कॅश, 7 तोळ सोनं, 5 मोबाईल सर्व गोष्टी पळवून आनल्या आहेत. तिच्याकडे तीन आधार कार्ड देखील आहेत.

सीमा हैदरचे तिचा प्रियकर सचिन मीणासोबतचे अनेक रोमॅटिंक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सीमा हैदरची ही लव्ह स्टोरी काही जणांना खरी वाटतेय. तिने पाकिस्तानात 12 लाख रुपयात आपली जमीन विकली.

त्यानंतर दुबईहून नेपाळमार्गे ती भारतात दाखल झाली. तिचे शिक्षण 5 वी झाले आहे. तिला इंग्लिश देखील बोलता येते. एक पाचवी शिकलेली महिला हे सर्व कसं करु शकते? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याशिवाय ती आपल्या निकाहबद्दलही खोट बोलत आहे. सीमा हैदरपासून भारतीय सुरक्षेला धोका आहे, असं बहुतांश नेटीझन्सच म्हणणं आहे. सीमा हैदर ती साधी-भोळी असल्याचा आव आणतेय, असे म्हटले जात आहे.

अनेकजण ती गुप्तहेर असल्याचे सांगत आहेत. गुप्तहेर कुठल्याही वेशात असू शकतो. तो कुणाला कुठला थांगपत्ता लागू न देता काम करणारा असू शकतो किंवा मिळून-मिसळून राहणारा असू शकतो.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now